मध्य प्रदेश : 50 गौराना सीधी टायगर रिझर्व्हमध्ये आणले जाईल
भोपाळ,
महाराष्ट्रातील सातपुडा वाघ संरक्षीत पेंच जंगलातून 50 गौराना थेट मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील संजय गांधी टायगर रिझर्व्हमध्ये आणले जाईल. असा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या राज्य वन्य प्राणी बोर्डच्या बैठकीत घेतला गेला.
मध्य प्रदेशचे मुख्य वन संरक्षण (वन्य प्राणी) आलोक कुमार यांनी सांगितले की भारतीय वन्य जीव संरक्षण डेहराडूनद्वारा संजय गांधी टायगर रिझर्व्हला वन्य प्राणी गौरच्या पुनर्स्थापनासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले. त्यांनी सांगितले की गौर पुनर्स्थापनेसाठी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाद्वारा तांत्रीकी परवानगीही दिली गेली आहे.
संजय गांधी टायगर रिझर्व्ह वन क्षेत्रात गौरची उपस्थितीचे ऐतिहासीक पुरावे मिळाले आहे. येथील वन क्षेत्रात मागील अनेक दशका पासून गौरची उपलब्ध नव्हती. टाइगर रिझर्व्ह सीधीमध्ये सातपुडा टाइगर रिझर्व्ह किंवा पेंच टाइगर रिझर्व्हमधून प्रस्तावित 50 गौर आणले जातील. या आधी कान्हा टायगर रिझर्व्हमधून बांधवगड टायगर रिझर्व्हमध्ये गौरला आणून पुनर्स्थापित केले गेले आहे.
ज्या वन क्षेत्रात वन्य प्राण्याची कधीकाळी उपस्थिती राहिली आहे आणि वर्तमानामध्ये अशा क्षेत्रामध्ये तेथे वन्य प्राणीही उपस्थ्ति नव्हते. यासाठी पुनर्स्थापनाचे अभियान चालविले जात आहे. या पूर्वीही अशा प्रकारचा प्रयोग केले आहेत. पन्ना टायगर रिझर्व्ह वाघ विरहीत झाले होते त्यावेळी येथे वाघाना आणले गेले होते आता पन्नामध्ये वाघांची चांगली संख्या झाली आहे.