तांदुळवाडी बु .येथील नुकसानीचे कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे पुर्ण!
जालना,
तालुक्यातील तांदुळवाडी बु .येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तालुका कृषी व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त पाहणी करत पंचनामे पुर्ण केले आहेत.
गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे तांदुळवाडी बु. शिवारात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून सरपंच उज्वला भिसे यांनी तात्काळ पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाकडे पाठपुरावा केला.
त्या अनुषंगाने
तलाठी शेख व तालुका कृषी सहाय्यक घोरपडे यांनी बाधीत क्षेत्राची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
सरपंच उज्वला भिसे यांनी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर ,कापूस ,मूग ,उडीद तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुधना आणि वाकी नद्यांच्या काठा जवळील काही शेतकर्यांच्या जवळपास दहा ते पंधरा हेक्टर जमिनी सुद्धा खरडून गेल्या आहेत. असे सांगून नुकसानीची गंभीर परिस्थिती पथकाच्या निदर्शनास आणून दिली.तर खचलेल्या शेतकर्यांनी नुकसानीचा पाढा पथका समोर वाचला.तसेच तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी शेतकर्यांनी या वेळी केली.
दरम्यान
पुराच्या पाण्यामुळे शेतकरी प्रल्हाद पंडित यांच्या मृत पावलेल्या बकरीचा ही पंचनामा करण्यात आला. झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्राथमिक पाहणी अहवाल तयार केला असून तो वरिष्ठांना सादर केला जाईल . असे पथकाच्या वतीने सांगण्यात आले.या वेळी उपसरपंच ईश्वरदास भिसे, गणेश भिसे, एकनाथ भिसे ,मधुकर भिसे ,विनोद भिसे, धर्मराज भिसे, वरून भिसे, आनंद भिसे , कारभारी भिसे, प्रभू भिसे यांच्या सह शेतकर्यांची उपस्थिती होती.