अत्याधुनिक अशा फिरत्या रुग्णालयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

जालना,

आयसीआयसीआय बँकेमार्फत सीएसआर फंडातून जालना जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा दोन फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आले

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर, डॉ.पद्मजा सराफ, डॉ.प्रताप घोडके, कौस्तुभ बुटाला, श्रीमती प्रतिमा खांडेकर आदींची उपस्थिती होती

यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या सीएसआर फंडातून जालना जिल्ह्यासाठी अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असे दोन फिरते दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. या फिरत्या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक उपकरणे, औषधी तसेच डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागामध्ये नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. या फिरत्या दवाखान्याला जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असल्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना मिळणार असल्याचे सांगत या फिरत्या दवाखान्यांचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी व्हावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!