सुनेच्या छळप्रकरणी आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा, मुलीवर गुन्हा दाखल

कराड

सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा काँग-ेसचे माजी अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. आदिती राजेश पाटील यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कराड पोलिसांनी सांगितले की, आदिती राजेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील, पती राजेश पाटील आणि नणंद सौ. टीना महेश पाटील यांनी संगनमताने शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पी. एन. पाटील यांच्यासह मुलगा राजेश, विवाहित मुलगी टीना यांच्याविरूध्द फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देण्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अदिती पाटील या सध्या आपले वडील सुभाष पांडुरंग पाटील (रा. वाखाण रोड, कराड) यांच्याकडे वास्तव्यास आहेत. राज्याचे सहकार मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची ती पुतणी आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!