वाशिममध्ये दूषित पाणी प्यायल्याने 100हून अधिक ग-ामस्थांना अतिसार
वाशिम,
जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव इथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने 100हून अधिक ग-ामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. यातील लागण झालेल्या रुग्णांवर आसेगांव, मंगरुळपीर इथे उपचार सुरू असून गंभीर असलेल्या 6 रुग्णांवर वाशिम इथे औषधोपचार सुरू आहे.
आसेगाव येथील वार्ड क्रमांक 2 मधील सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाले होते. हे पाणी प्यायल्याने 100हून अधिक ग-ामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य पथक ग-ामस्थांची आरोग्य तपासणी करत असून लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.