उल्हासनगर: हातोड्याचा धाक दाखवत केलं अपहरण, पडक्या खोलीत डांबून ठेवून रात्रभर अत्याचार, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी (सुधारित)

उल्हासनगर,

मुंबईतील साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजं असताना उल्हासनगरमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.  उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पडक्या घरात संबंधित पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून रात्रभर बलात्कार करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी बलात्कार करणार्‍याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय पीडित मुलगी शुक्रवारी रात्री शिर्डीहून कल्याण आणि त्यानंतर कल्याणहून उल्हासनगर याठिकाणी आली होती. दरम्यान उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्काय वॉकवर आपल्या मित्रांशी बोलत उभं असताना आरोपीनं पीडित मुलीला हातोड्या धाकानं अपहरण केलं आहे. आरोपीच्या हातातील हातोडा पाहून तिच्या दोन्ही मित्रांनी घटनास्थळावरून पलायन केलं . यानंतर आरोपीनं पीडितेला उल्हासनगर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 70-80 मीटर अंतरावर असणार्‍या एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडितेला रात्रभर डांबून ठेवत नरक यातना दिल्या आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास पीडित मुलीनं आरोपीच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा आरोपीनं तिला मारहाण देखील केली आहे. अशा अवस्थेत पीडित मुलगी ज्या पोलीस ठाण्यात गेली होती. तिथे पीडितेची तक्रार का घेतली नाही? याचा तपास आम्ही करणार आहोत. तसेच जे पोलीस अधिकारी ड्युटीवर होते. त्यांचं उत्तर काय होतं तेही तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहितीही लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळी पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या मित्रांना फोन करून सांगितला. तसेच याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासही सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एक टीम तयार केली. तसेच आरोपीच्या वर्णनाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्रीकांत गायकवाड असं आरोपीचं नाव असून तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची  माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पिडीतेची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून काय उपाययोजना करता येईल याचा आढावा पोलिसांनी घेतला आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात ज्या ठिकाणी लाईटची सोय नाही, अशा ठिकाणी लाईटची व्यवस्था केली जाईल. तसेच पीडीतेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पोक्सो ?क्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!