बँक ऑफ इंडिया कडून शेतकरी हिताची जपणूक : नारायण गजर पाटील
जालना,
पिक कर्ज वेळेत वितरित करण्या सोबतच विमा, अनुदान यांचे भेदभाव न करता वाटप करून बँक ऑफ इंडिया तर्फे शेतकरी हिताची जपणूक केली जात असल्याची भावना प्रहारचे जिल्हा निरिक्षक नारायण गजर पाटील यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केली.
बँक ऑफ इंडिया च्या एकशे सोळाव्या वर्धापन दिन निमित्त गुरूवारी ( ता. 09) नारायण गजर पाटील यांनी पदाधिकारी व प्रहार सैनिकांसह जालना येथील शाखेस भेट दिली. शाखा व्यवस्थापक विजय सोनकुसरे यांनी बँकेतर्फे नारायण गजर पाटील यांचा सत्कार केला. या वेळी विभागीय विमा अधिकारी विशाल पोळ, विशेष सहाय्यक राजेश व्यवहारे, वरिष्ठ प्रबंधक प्रियंका जाधव, सागर कुंटे, शिवाजी दहेकर, कृष्णा घायाळ, आदित्य पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नारायण गजर पाटील यांनी जालना शाखेत शेतकरी आणि ग्राहकांना मिळत असलेली सन्मान जनक वागणूक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सौहार्द पुर्ण वर्तनाचे अन्य बँकांतील व्यवस्थापनाने अनुकरण केल्यास शेतकर्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत. अशी अपेक्षा गजर पाटील यांनी व्यक्त केली.
शाखा व्यवस्थापक विजय सोनकुसरे यांनी जालना शाखेने सहयोगी विमा संस्थेची लक्ष प्राप्ती केली असून ठेवीदार व ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी बँक प्रयत्न शील असल्याचे सांगितले.
या वेळी रमेश अग्रवाल, समाधान राऊत, अशोक हरजुले, रमेश डोळसे, ज्ञानेश्वर जावळे ,संतोष वैद्य ,राजेंद्र नागपुरे, मकरंद विडोळकर यांच्यासह अधिकारी , कर्मचारी वृंद व ग्राहक उपस्थित होते.