अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपनीस कळविणे बंधनकारक – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना,

जालना जिल्हयामध्ये मागील चार ते पाच दिवसामध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबधित विमा कंपनीस 72 तासांमध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2021 जालना जिल्हयामध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास , भुस्खलन गारपीट, ढगफुटी, अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. या जोखमीअंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढवुन किंवा ओसंडुन वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शिरुन दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे 72 तासाच्या आत नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. तथापि विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पिक नुकसानीची माहिती पूर्वसूचना कंपनीस देणे आवश्यक आहे. त्यासाठी पिकविमा धारक शेतकर्‍यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन उठजझ खछडणठअछउए हे अप डाऊनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 1800 102 4088 या टोल फ्री क्रमांकावर किंवा ीसळलश्र.ारहरीरीहीींररसीळऽीशश्रळरपलशरवर.लेा या ई मेलवर नुकसानीची पूर्वसूचना दयावी. काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमादवारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधी, संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा आपल्या गावातील संबधित कृषि सहायक यांचेकडे प्रत्यक्ष 2 प्रतीत अर्ज देऊन एका प्रतीवर पोहोच घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!