तामिळनाडूमध्ये पेरियारांची जयंती सामाजीक न्याय दिवस म्हणून साजरी केली जाईल – स्टॅलिन
चेन्नई,
तामिळनाडूमध्ये समाज सुधारक आणि द्रविड मुनेत्र कळघम ( डीएमके) चे संस्थापक ई.व्ही.रामास्वामी पेरियार यांची जयंती सामाजीक न्याय दिवसाच्या रुपात साजरी केली जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी सोमवारी विधानसभेत केली. समाज सुधारक पेरियार यांची जयंती 17 सप्टेंबरला असते.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या घोषणेचे विधानसभेतील सर्व राजकिय पक्षांनी स्वागत केले. स्टॅलिन यांनी म्हटले की या दिवशी राज्य सरकारच्या सर्व कर्मचार्यांनी स्वाभिमान, तर्कवाद, भाईचारा, समानता, मानवतावाद आणि सामाजीक न्यायाच्या सिध्दांतांचे पालन करण्याचा संकल्प घेतला पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की पेरियारद्वारा सामाजीक क्रुपध्दतींच्या विरोधात अथक अभियानाच्या कारणामुळे तामिळनाडू राज्याने जे तर्कसंगत नाही अशा कोणत्याही गोष्टींवर प्रश्न उपस्थित करण्याच्या संस्कृतिला विकसीत केले आहे. पेरियार यांनी तामिळनाडूमध्ये लोकांच्या मनात विज्ञानाच्या प्रती रुची वाढवली असून त्यांना प्रेमाने थनथाई पेरियारही म्हटले जात आहे.
स्टॅलिन यांनी म्हटले की पेरियार यांनी सतत मागास वर्गा बरोबरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातींच्या अधिकारांंना कायम ठेवले होते आणि या श्रेणीतील लोकांच्या सामाजीक उत्थानासाठी त्यांची कटिबध्दताने 1951 मध्ये भारताच्या राज्यघटनेत पहिले संशोधन केले गेले होते.
विधानसभेतील नेते आणि राज्याचे जल संसाधन मंत्री एस.दुरईमुरुगनने विधानसभेला सांगितले की पेरियारला यांना सतत स्मरणात ठेवले गेले पाहिजे आणि त्यांच्या स्वाभिमानाच्या सिध्दांताला पाठयपुस्तकांमध्ये सामिल केले गेले पाहिजे.
भाजप नेते नैनार नागेंद्रननी म्हटले की भाजप जातींच्या उन्मूलन आणि माहिलांच्या अधिकारांना कायम ठेवण्यामध्ये विश्वास करतो आहे.
अन्नाद्रमुक नेते वैथालिंगमनीही स्टॅलिनच्या वक्ताव्याचे स्वागत केले आणि म्हटले की अन्नाद्रमुक सामाजीक न्याय आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी आहे. पेरियार एक महान समाज सुधारक होते ज्यांचे सतत स्मरण केले गेले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे.