कल्याणमध्ये 138 निरंकारी भक्तांचे रक्तदान

कल्याण,

संत निरंकारी सत्संग भवन, कोनगाव, कल्याण (पश्चिम) येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 138 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. या शिबिरामध्ये रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढीकडून पार पाडण्यात आले.

संत निरंकारी मिशनच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी रक्तदान शिबिरे सुरू असून त्या अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशाबरोबरच संपूर्ण राज्यामध्ये आणि देशाच्या विविध भागात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मंडळाच्या कल्याण ब-ांचमधील हे शिबिरदेखील याच व्यापक रक्तदान अभियानाचा भाग आहे.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे डोंबिवली झोनचे प्रभारी रावसाहेब हसबे, कोनगाव ग-ामपंचायतचे उपसरपंच राजेश मुकादम, कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या हस्ते संयुक्तरीत्या दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. या शिबिराला सदिच्छा भेट देणार्‍या मान्यवरांमध्ये पंचायत समिती सदस्य दर्शन म्हात्रे, ग-ामपंचायत सदस्य कमलाकर नाईक, डॉ. अमोल कराळे, शिवसेना विभाग प्रमुख प्रल्हाद राखाडे, बुर्दुल ग-ामपंचायत सरपंच सुनील पाटील, समाजसेवक नंदू राखाडे आदी मान्यवरांचा सहभाग होता. मंडळाच्या विविध शाखांचे मुखी तसेच सेवादलाचे अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!