उत्तर प्रदेशमध्ये माजी राज्यपालांवर देशद्रोहाचा गुन्हा
रामपूर(उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अपमानजनक टिपणी केल्याने माजी राज्यपाल अजीज कुरैशींच्या विरोधात भाजपचे नेते आकाश सक्सेनाच्या तक्रारीवरुन रामपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाइंस ठाण्यात रविवारी रात्रीला पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे.
काँग-ेसचे ज्येष्ठ सदस्य 81 वर्षीय कुरैशीनी 2014-15 मध्ये मिझोरमच्या राज्यपालांच्या रुपात काम केले होते. ते शनिवारी समाजवादी पक्षाचे नेते मोहम्मद आझम खान यांच्या पत्नी तंजीन फातिमा यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी रामपूरला गेले होते. प्रसार माध्यमांशी बोलताना कुरैशीनी कथितपणे योगी सरकारची तुलना राक्षसांशी केली होती
आकाश सक्सेनानी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले की कुरैशीद्वारा करण्यात आलेल्या टिपणीला सोशल मीडियावर पसंत केले जात आहे जे दोनीही समुदायामध्ये तणाव निर्माण करत आहे आणि ऐवढेच नाही तर सांप्रदायीक दंगली होऊ शकतात.
कुरैशींवर कलम 153ए (धर्म, जाती, आदिच्या आधारावर दोन समुहांमध्ये शत्रूता निर्माण करणे), 153 बी (आरोप, राष्ट्रीय एकतेसाठी हानिकारक दावे), 124ए (देशद्रोह) आणि 505 (1) (बी) (भिती निर्माण करण्याचा इरादा) च्या अंतर्गत गुन्हा नोदविला गेला आहे.
रामपूरचे अतिरीक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) संसार सिंहनुसार आकाश सक्सेनाद्वारा माजी राज्यपाल अजीज कुरैशींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि प्रारंभिक तपासानंतर संबंधीत कलमा अंतर्गत प्राथमिकी नोंदवली गेली होती. आम्ही कायद्यानुसार पुढील कारवाई करुत.