लीबिया : दिवंगत नेते गद्दाफीचा मुलगा जेलमधून मुक्त

त्रिपोली,

लीबियाच्या अधिकार्‍यांनी देशाचे दिवंगत हुकुमशाह मुअम्मर गद्दाफींचा मुलगा सादी गद्दाफीला जेलमधून मुक्त केले आहे. त्यांच्यावर 2005 मध्ये एका फुटबॉल खेळाडू आणि लीबियाच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाच्या हत्येमध्ये सहभागी असल्याच्या  आरोपामध्ये मुकदमा चालविला गेला होता. परंतु त्याला एप्रिल 2018 मध्ये या प्रकरणात निर्दोष ठरविण्यात आले होते व आता त्याला मुक्त केले गेल्याची माहिती  अ‍ॅटॉनी जनरल कार्यालयाच्या एका सूत्राने दिली.

स्थानीय मीडियानुसार 27 वर्षीय सादी आपल्या मुक्ततेनंतर तत्काळ तुर्कीकडे रवाना झाला असून आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह इजिप्तला जाण्याची योजना बनवत आहे.

लीबियामध्ये 2011 मध्ये बंडाच्या दरम्यान सादी नाइजरला पळून गेला होता परंतु त्याला तीन वर्षानंतर प्रत्यार्पित करण्यात आले आणि त्यावेळे पासून तो त्रिपोलीतील जेलमध्ये कैदेत होता.

लीबियाच्या अधिकार्‍यानुसार नाइजरने पहिल्यांदा त्याला मानवीय कारणासाठी आश्रय दिला परंतु 2014 मध्ये सादीला लीबियाकडे सोपविले गेले. दिवंगत नेते मुअम्मर गद्दाफीच्या शासनाच्या पतनानंतर लीबिया असुरक्षा आणि अराजकताचा शिकार होत आहे.

राजकिय विभाजनाच्या वर्षानंतर फेब-ुवारीमध्ये एकता सरकार आणि एक प्रेसीडेंसी परिषदेच्या एका नवीन कार्यकारी प्राधिकरणाच्या नियुक्तीनंतर लीबियाची सुरक्षा स्थिती कमजोर बनली आहे. कारण देशातील विविध भागामध्ये सुरक्षा उल्लंघन आणि अपहरणाच्या घटना होत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!