योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केल्या प्रकरणी माजी राज्यपाल अझीज कुरेशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
लखनऊ,
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अझीज कुरेशी यांच्याविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ता आकाश सक्सेनाच्या तक्रारीवरून रामपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात कुरेशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आपल्या तक्रारीत आकाश सक्सेना यांनी म्हटले की, माजी मंत्री आझम खान यांच्या घरी त्यांची पत्नी आणि रामपूरच्या आमदार तंझीम फातिमा यांना भेटण्यासाठी कुरेशी गेले होते. त्यांनी जिथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना सैतान आणि रक्त शोषक राक्षस अशी केली होती. कुरेशी यांचे हे वादग-स्त वक्तव्य दोन समुदायामध्ये तणाव निर्माण करू शकते आणि जातीय दंगली घडवून आणू शकते, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
एफआयआरच्या कॉपीनुसार, कलम 154 ए अंतर्गत राजद्रोह, 153 ए अंतर्गत जाती-धर्मातील वैर वाढवणे आणि राष्ट्रीय एकता आणि अखंडतेविरोधात वक्तव्य केल्याबद्दल 153 बी अंतर्गत माजी राज्यपालांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच लोकांमध्ये भ-म आणि दहशत पसरवण्यासाठी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.