पंतने सिद्ध केले की ते एकापेक्षा जास्त शैलीमध्ये फलदांजी करण्यात सक्षम : हुसैन
लंडन,
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनचे म्हणणे आहे की भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ॠषभ पंतने सिद्ध केले की तो एकापेक्षा जास्त शैलीमध्ये फलंदाजी करण्यात सक्षम आहे. हुसैनने पुढे म्हटले की पंतने द ओवलमध्ये खेळले जाणार्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जबाबदारीने फलंदाजी केली.
पंतने दुसर्या डावात 106 चेंडूत अर्धशतक बनवले आणि शार्दुल ठाकुरसोबत शतकीय भागीदारी केली.
हुसैनने डेली मेलसाठी लिहलेल्या स्तंभात सांगितले, हे पाहिले जाऊ शकते की कोणत्याप्रकारे पंतने जबाबदारी फलंदाजी केली आणि याने दुसर्या बाजूवर उभे खेळाडूला मदत मिळाली.
त्याने सांगितले पंतने दाखवले की तो एकापेक्षा जास्त शैलीमध्ये फलंदाजी करण्यात सक्षम आहे. त्याने असे अगोदर पूर्वी केले. यावर्षी चेन्नईमध्ये त्याने नवीन चेंडूने जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्ससमोर परेशानी झेलल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना परेशान केले होते.
हुसैनचे मत आहे की इंग्लंडचा कर्णधार जोए रूटची अप्रभावी फील्डिंग सेटिंग्सने पंतला स्ट्राइक रोटेट करणे आणि आपला मार्ग बनवण्यात मदत केली.
हुसैनने सांगितले मला वाटते की रूटने पंतसाठी चुकीची फील्डिंग सेट केली कारण या मालिकेत पहिल्यांदा तो जबाबदारीने फलंदाजी करत होता.
53 वर्षीय माजी खेळाडूने भारताच्या खालच्या क्रमाची स्तुती केलली ज्याने इंग्लंडला 368 धावांचे ध्येय देण्यात योगदान दिले.
हुसैनने सांगितले जेव्हा देखील भारतीय एकादश या कसोटी मालिकेत उतरले, पहिले लक्ष होते की त्याची मजबुती किती मोठी आहे. त्याच्या खालच्या क्रमाने फलंदाजीवर काम केले आणि मालिकेत तीसर्यांदा आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्याने म्हटले पहिल्यांदा लॉर्ड्समध्ये मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने 89 धावा जोडले आणि इंग्लंडला मागे सोडले. नंतर या कसोटी सामन्याच्या पहिल्य दिवशी शार्दुलने संघाला लढण्यायोग्य स्थितीपर्यंत पोहचवले.
चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताचे अंतिम चार फलंदाजांनी 150 धावा जोडल्या ज्याने शार्दुलने अर्धशतक बनवले जेव्हा की बुमराह आणि उमेश यादवने देखील काही योगदान दिले.