अयोध्या दौर्याच्या आधी पोस्टर वादावरुन ओवैसींच्या विरोधात साधूंचा संताप
अयोध्या,
अयोध्यामधील साधू संत 7 सप्टेंबरला होणार्या एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या अयोध्या दौर्याच्या विरोधात आहेत कारण त्यांच्या पक्षाच्या पोस्टरवर अयोध्याच्या ऐवजी फैजाबादचा वापर केला गेला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने 2018 मध्ये फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले होते.
संतानी अयोध्यामधील ओवैसीच्या प्रवेशला रोखण्याची धमकी देत म्हटले की ही हरकत जाणूबूझून आणि धार्मिक आधारावर लोकांचे धुव-ीकरण करण्यासाठी केली गेली होती. जर फैजाबादला पोस्टरवरुन हटविले गेले नाही तर संतानी शोषीत वंचित समाज संमेलनाच्या तत्वावधानामध्ये होत असलेल्या त्यांच्या रॅलीला रोखण्याची धमकी दिली आहे.
ओवैसी 7 सप्टेंबरला राम जन्मभूमी पासून जवळपास 40 किलोमीटर दूर मुस्लिम बहुल मतदारसंघ क्षेत्र रुदौलीमध्ये एका जनसभेला संबोधीत करणार आहेत.
हनुमानगडीचे महंत राजू दास यांनी म्हटले की ओवैसी अयोध्याचे नाव फैजाबाद कशामुळे लिहित आहेत ? आम्ही त्यांच्या सांप्रदायीक विचारधारांचा निषेध करत आहोत आणि पोस्टरला हटविण्याची मागणी करत आहोत.
तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी म्हटले की ओवैसींचे हिंदू विरोधी पाऊल हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपमान आहे. जर फैजाबाद नावाचे पोस्टर हटविले गेले नाही तर अयोध्यामध्ये ओवैसीचा प्रवेश वर्जित असेल आणि रुदौलीमधील जनसभा बाधीत होईल.
अयोध्या प्रकरणाच्या संबंधात असलेले सर्वात जुने व्यक्ती इकबाल अंसारीनीही अयोध्यामध्ये ओवैसींच्या राजकिय प्रवेशाचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की मुसलमानानी ओवैसींपासून सावध राहिले पाहिजे. त्यांनी उत्तर प्रदेशातील लाखो मुसलमानांच्या भावनाशी खेळू नये. मी लोकांना त्यांच्या धुव-ीकरणाच्या राजकारणा पासून प्रभावित न होण्याचे आवाहन करत आहे.
या दरम्यान एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाहनवाज सिद्दीकीनी म्हटले की आम्हांला फैजाबादला त्याच्या जुन्या नावाने बोलण्याची सवय आहे. नवीन नावाला स्मरणात ठेवण्यासाठी वेळ लागतो आहे आणि हा एक किरकोळ मुद्दा आहे.