येवला उपजिल्हा रूग्णालयात मिळतील उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा; कोरोनामुळे थांबलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक,

कोरोनामुळे थांबलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासोबतच येवला शहरात अद्ययावत रुग्णालयाची मागणी होती, त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचा विकास करण्यात आला आहे. याठिकाणी ऑॅक्सिजनसाठी कायमस्वरूपी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. तसेच भविष्यात या रुग्णालयात उत्तम वैद्यकीय सुविधा मिळतील, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग-ाहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला नगरपालिका हद्दीतील देवी खुंट नागड दरवाजा रोड येथे देवी मंदिर तर नागड दरवाजा पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, नगरसेवक सर्वश्री निसार शेख, मुश्ताक शेख, अमजद शेख, मलिक शेख, रईसा बानू शेख, तहसीर बानू शेख, राजेंद्र लोणारी, दिपक लोणारी, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेले दोन वर्षे कोरोनामुळे विकास कामांना उशीर झाला असला तरी विकास कामांचा हा बॅकलॉक भरून काढण्यात येईल. विकासाची कामे शहरात विविध होत आहे यापुढेही होतील मात्र हे करत असताना शहर स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. त्यातूनतच रोगावर नियंत्रण मिळणे शक्य होणार आहे. कोरोना अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. जिल्ह्यात ऑॅक्सिजन साठा करण्यासाठी टाक्या बसविण्यात आलेल्या आहे. तसेच ऑॅक्सिजन जनरेशन प्लँट देखील विकसित करण्यात आलेले आहे. त्यामुळे येवला तसेच जिल्हाभरात ऑॅक्सिजनची कमतरता भासणार नाही अशीही व्यवसथा करण्यात आलेली आहे.

शहरात आवश्यक असलेली सर्व विकास कामे टप्प्या टप्याने पूर्ण करण्यात येतील. असे सांगून पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी येत्या काही दिवसात अनेक सण उत्सव आहे हे सर्व निर्विघ्नपणे पार पाडण्यात यावे, असे आवाहनही यावेळी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!