समाजात सकारात्मक बदलासाठी सज्ज व्हा!
जालना,
मानव सेवेत आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या रोटरी परिवारात कोणाचा वैयक्तिक अजेंडा चालत नाही, येथे रक्ताच्या पलीकडचे नाते संबंध निर्माण होतात. रोटरी परिवाराचे सदस्य बनल्यावर आपण केवळ गाव, जिल्हा, राज्यापयर्ंत मर्यादित न राहता देश व विश्वाचे घटक बनतो. समाजकार्यात आनंद मानणारे स्वयंसेवक ”रोटरी हीच जात आणि सेवा हाच धर्म” मानून सेवा करत असल्याने नवीन सदस्यांनी समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सज्ज व्हावे. असे आवाहन रोटरी थ-ी.वन. थ-ी. टू. चे प्रांतपाल रो. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी आज येथे बोलताना केले.
रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन च्या वतीने प्रांत थ-ी.वन. थ-ी. टू. झोन. सी. अंतर्गत नवीन सदस्यांसाठी रविवारी( ता. 05)एका हॉटेलमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी रो .ओमप्रकाश मोतीपवळे बोलत होते.
रोटरी च्या उपप्रांतपाल रो. डॉ. सुमित्रा गादिया , रो.पुष्पा आरबळे, रो.दिलीप मालपाणी , रो. दादा करंजुले, रो. मनीष नय्यर , रो. रागिनी कंदाकुरे, समुपदेशक रो. दिपक पोफळे, संचालक रो.संजय अस्वले, फोरम लिडर रो. गोविंदराम मंत्री, समन्वयक रो. मनमोहन भक्कड, मिडटाउन चे अध्यक्ष रो. महेश धन्नावत ,सचिव रो. प्रशांत बागडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांतपाल रो.ओमप्रकाश मोतीपवळे पुढे म्हणाले, पॉल हॅरिस यांनी रोटरी ची स्थापना करून आपले विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्यक्षात आणले . कायद्याचे अभ्यासक असलेले अध्यक्ष रो. महेश धन्नावत यांना रोटरी सदस्यांना काय द्यायचे याचे ज्ञान असून त्यांच्याप्रमाणेच समाजकार्यात रुची असलेले सक्रिय सदस्य बनवा . असे सांगून ” आज जगात सकारात्मक आणि नकारात्मकता सुरू असताना आपण सक्रिय होऊ ” असा सल्ला शेवटी रो. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी दिला.
प्रांताचे सदस्य विकास अध्यक्ष असलेले रो. संजय अस्वले यांनी ” सेवेतून बदल घडविणे ” हे ध्येय असलेल्या रोटरीचे प्रांतांमध्ये सध्या 33 25 सदस्य असून आगामी वर्षभरात आकराशे नवीन सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना महिलांची सदस्यसंख्या वाढीवर भर द्यावा. असे सांगून नवीन सदस्य जोडणे, त्यांना टिकून ठेवण्याबाबत चल चित्रांद्वारे संजय अस्वले यांनी माहिती दिली.
फोरम लिडर रो. गोविंदराव मंत्री म्हणाले, रोटरी सदस्य हे विविध पैलूंना समजून घेणारे आहेत. नवीन सदस्यांमुळे क्लब मध्ये उत्साह वाढतो ,त्यांचे अनुभव, कौशल्याचा लाभ घेऊन नवनिर्मिती तसेच नवे नेतृत्व उभे राहील. असा विश्वास व्यक्त करत जुने सदस्य हे क्लबचा अमूल्य ठेवा असून क्लब सक्षम व लवचिक कसा राहील, यावर लक्ष केंद्रित करा. असा सल्ला गोविंदराम मंत्री यांनी दिला.
प्रास्ताविकात समन्वयक रो. मनमोहन भक्कड यांनी पाच वषार्ंपूर्वी स्थापन झालेल्या रोटरी मिडटाउन ने आंतरराष्ट्रीय प्रकल्पां सोबतच राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची रोटरीच्या मुखपत्रात केंद्रस्थानी दखल घेतल्याचे सांगितले.
दीपप्रज्वलनाने शिबिराचा प्रारंभ झाला. सूत्रसंचालन रो. धवल मिश्रीकोटकर व रो. सागर दक्षिनी यांनी केले तर सचिव रो. प्रशांत बागडी व रो. सुरज गेही यांनी आभार मानले.
यावेळी महेश भक्कड, दीपांक अग्रवाल ,दिनेश छाजेड, दीपक गेही, अल्केश पित्ती , गौरव मोदी , आनंद जिंदल, पंकज गंधकवाला, राहुल भक्कड, अनुराग अग्रवाल, मनोज अग्रवाल ,अनुप नानावटी ,प्रतिक नानावटी, रो.महेंद्र बागडी , रो. अरुण मोहता ,स्मिता चेचाणी, डॉ. सुरेश साबू ,प्रफुल्लता राठी, डॉ. नितीन खंडेलवाल, महेश माळी, श्रीकांत दाड,विरेश बगडिया, अक्षत झुनझुनवाला, मधु राठी यांच्यासह औरंगाबाद, अहमदनगर, संगमनेर ,अकोले, पैठण येथील रोटरी चे पदाधिकारी व सदस्य यांनी शिबिरात सहभाग नोंदवला.
चौकट…
परिसंवाद ,गट चर्चेतून नवी दिशा. .!
प्रशिक्षण शिबिरात क्लब मजबूत होण्यासाठी नवीन सदस्य जोडणे, आव्हान, संधी, रोटरीचे उपक्रम, सदस्यांचा सहभाग ,रोटरी चे फायदे, संसाधने, रोटरी त का सहभागी व्हावे, अशा विविध विषयांवर पाच सञांत रो. डॉ. दीपक पोफळे, माजी प्रांतपाल रो. गिरीश रायते, रो. डॉ. सुरेश साबू, रो. सुहास वैद्य, रो. डॉ. माधव अंबेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच नवीन सदस्य जोडने या वर गटचर्चा घेण्यात आली. तज्ञांनी केलेले मार्गदर्शन, त्यांचे अनुभव पदाधिकारी व सदस्यांना फायदेशीर ठरेल तसेच यातून नवी दिशा मिळेल. असा विश्वास मिडटाउन चे अध्यक्ष रो. महेश धन्नावत यांनी व्यक्त केला.