उत्तर प्रदेश : मुलीच्या पोटातून दोन किलो केसांचा गोळा काढला

लखनऊ,

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील बलरामपूर रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका टिमने गुरुवारी एका 17 वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करुन जवळपास दोन किलोग-ॅम वजनांच्या केसांचा एक गोळा बाहेर काढला आहे.

बलरामपूर जिल्ह्यातील मुलीच्या पोटात दूखत होते आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनलची समस्या होत होती. यानंतर तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. अल्ट्रासाउंड आणि सीटी स्कॅनच्या माध्यमातून प्रारंभिक निदानात मुलीच्या पोटात एक अज्ञात गाठ दिसून आली.

शस्त्रक्रिया टिमचे नेतृत्व करणारे डॉ.एस.आर समद्दार यांनी म्हटले की मी एक अ‍ॅडोस्कोपी केली आणि केसांच्या घाणीला पाहिले. रुग्ण आपल्या केसाना हटविण्यास नकार देत होती. तिला खूप समजविल्यानंतर तिने स्वीकार केले की ती मागील पाच वर्षा पासून आपल्याच केसाना खात होती.

ट्राइकोबेजार नावाचा हा दुर्लभ विकास हा ज्यावेळी मानसिकपणे अस्थिर व्यक्ती केसांना ओढतो आणि खाण्यासाठी जुनुनी होत असतो त्यावेळी ते पोटात एका गाठीच्या रुपात जमा होतात.

दोन किलोग-ॅम वजन आणि 20 इनटू 15 सेंटीमीटर आयाम असलेल्या केसांच्या गाठीला हटविण्यासाठी दीड तासाची शस्त्रक्रिया करावी लागली.

डॉ.समद्दारांनी म्हटले की रुग्णाला परामर्शची आवश्यकता आहे आणि यासाठी आम्ही मनोवैज्ञानिक मदतीचा सल्ला दिला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!