ओवैसी आयोध्यामधून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक अभियानाची सुरुवात करणार

लखनऊ,

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी 2022 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीतील आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसीनी  7 सप्टेंबरला आयोध्या जिल्ह्यातून करण्याचा निर्णय केला आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी 7 सप्टेंबरला आयोध्यातील रुदौलीमधील एका संमेलनाला संबोधीत करतील. यात मुसलमान, दलित, मागास आणि सवर्ण हिंदूनाही आमंत्रीत करण्यात आले आहे.

एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकात अलीनी म्हटले की फक्त मुस्लिमच नव्हे तर अन्य समुदयाचे केंद्रातील आणि राज्यातील सत्तारुढ भारतीय जनता पक्ष (भाजप)  सरकारद्वारा परेशान आणि शोषण केले गेले आहे. एआयएमआयएमने पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये वंचित-शोषीत समाज संमेलनाची एक मालिका आयोजीत करुन भाजप सरकारद्वारा दाबण्यात आलेल्या लोकांच्या अधिकारांसाठी लढण्याचा निणर्य केला आहे.

8 सप्टेंबरला ओवैसी अशाच प्रकारच्या अजून एका संमेलनाला सुलतानपूर आणि बाराबंकीमध्ये संबोधीत करतील.शौकत अलीनी म्हटले की हे समुदाय एका पर्यायाच्या शोधात आहेत आणि एआयएमआयएम वंचित समुदायांच्या आशा आणि आवाजाच्या रुपात पुढे येत आहे. एआयएमआयएम लोकांकडे 2022 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याणासाठी काम करणार्‍या सरकारला बनविण्यासाठी याचे समर्थन करण्याचे आवाहन करेल.

एआयएमआयएमने उत्तर प्रदेशातील 100 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. एआयएमआयएम भागीदारी संकल्प मोर्चा बनविण्यासाठी लहान राजकिय पक्षांच्या आघाडीत सामिल झाला आहे. यात ओम प्रकाश राजभरांंच्या नेतृत्वाखालील सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (एसबीएसपी) , बाबू सिंह कुशावाहांच्या नेतृत्वाखालील जन अधिकारी पार्टी, बाबू रामपालांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय उदय पार्टी, प्रेमचंद प्रजापतींच्या राष्ट्रीय उपेक्षित समाज पार्टी आणि अनिल सिंह चौहानाच्या नेतृत्वाखालील जनता क्रांती पार्टी सामिल आहेत.  मोर्चाने भीम आर्मीला निवडणूक पूर्व आघाडीत सामिल होण्यासाठी आमंत्रीत केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!