लाठी हल्ला करणार्या अधिकार्?याचे निलंबन करा नसता महाराष्ट्र भर तीव- आंदोलन!
जालना,
मातंग समाज बांधवांसह पञकारांवर अमानुष लाठीहल्ला करणारे नांदेड जिल्ह्यातील डि. वाय. एस. पी. कांबळे यांना तात्काळ निलंबित करावे नसता महाराष्ट्र भर तीव- आंदोलन करण्यात येईल. असा इशारा लहुजी शक्ती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर यांनी दिला आहे.
या संदर्भात शुक्रवारी ( ता. 03) सचिन क्षीरसागर व मराठवाडा अध्यक्ष डॉ. दिलीप अर्जुने यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे ,
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अग्रभागी असलेले क्रांतिकारक, शाहीरी, साहित्यातून प्रबोधन करणारे साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नांदेड जिल्ह्यातील उगळी गावात मातंग समाज मंदिराच्या नियोजित जागेत बसविण्यात आला होता. मात्र गावातील काही समाज कंटकांनी डि. वाय. एस .पी. कांबळे यांना हाताशी धरून पोलीस बळाचा वापर करत सदर पुतळा काढून घेतला. एव्हढ्या वरच न थांबता डि. वाय. एस. पी. कांबळे यांनी पोलीस दलाकरवी मातंग समाज बांधवांच्या घरात घुसून महिला, तरूण व समाज बांधवांवर अत्यंत क्रुरपणे लाठीहल्ले केले. विशेष म्हणजे तेथे वातार्ंकनासाठी आलेल्या पञकारांनाही बेदम मारहाण करत पोलीसांनी त्यांची ओळख पञे हिसकावून घेतली.असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले . घटनेचे गांभीर्य पाहता पञकार प्रतिबंधक कायदा 2017, महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक)1979 नियम क्रं 03, महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल) 1979(04) ,
नुसार तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. नसता लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महाराष्ट्र भर तीव- आंदोलन छेडले जाईल. असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर युवा प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर,मराठवाडा अध्यक्ष डॉ. दिलीप अर्जुने, संतोष निकाळजे,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अर्जुन धाकतोडे,युवा शहराध्यक्ष विकास यंगड, रविराज पाखरे, चांदणे, संतोष गायकवाड, अविनाश खाजेकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.