तब्बल 25 लाखांचे हॉटेलचे बिल बुडवून केले पलायन, नवी मुंबईतील खारघर येथील घटना
नवी मुंबई,
तब्बल 25 लाखांचे बिल बुडवून ग-ाहकाने चक्क बाथरूमच्या खिडकीतून मुलाला घेऊन पलायन केले. हा प्रकार नवी मुंबईतील खारघरमध्ये घडला आहे. संबधित भामट्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
नोव्हेंबर महिन्यात केली होती बुकिंग
(24 नोव्हेंबर 2020)ला मुरली मुरुगेश कामत (43)हा मरोळ अंधेरी येथे राहणारा व्यक्ती संध्याकाळी सहाच्या दरम्यान नवी मुंबईमधील खारघर येथील थ-ी स्टार हॉटेलमध्ये त्याचा बारा वर्षाचा मुलगा तनिष कामतसह आला होता. संबंधित व्यक्तीने तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्ही. एफ. एक्स व ऍनिमेशनचे काम करतो असे सांगून लवकरच स्वत:चे काम सुरू होणार असल्याची माहिती हॉटेल मालक संतोष शेट्टी यांना दिली. तसेच, सध्या पैसे नसल्याचे सांगत एक महिन्यानंतर पैसे देतो असे सांगत मुरली कामत याने पासपोर्ट जमा केला. हॉटेल मालक संतोष शेट्टी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर मुरली कामत याने स्वत:साठी व मुलाला राहण्यासाठी सुपर डीलक्स रूम बुक केला व दुसरा डीलक्स रूम मीटिंगसाठी बुक केला. त्यानंतर मुरली कामत या व्यक्तीला इतर लोक हॉटेलमध्ये भेटण्यासाठी येत असत. महिना झाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने मुरली यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, नंतर पैसे देतो सांगून ते वेळ मारून नेत. त्यानंतरही हॉटेल व्यवस्थापनाने वारंवार बिलाची मागणी केली. मात्र, मुरली कामत काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत असत. फेब-ुवारी महिन्यात मुरली यांनी तीन नाव नसलेले व सही केलेले चेक दिले. मात्र, ते चेक बँकेत जमा करण्यास हॉटेल स्टाफने विचारणा केली असता ते तारखेवर तारीख देत असत.
’मुरली कामत कडे हॉटेलमध्ये पैसे मागण्यास लोक येत’
मुरली कामत याच्याकडे पैसे मागण्यास विविध लोक हॉटेलमध्ये येत असत. हॉटेल व्यवस्थापकाच्या मुरली कामात हा फसवणूक करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे लवकरात लवकर रक्कम जमा करावी असे हॉटेल व्यवस्थापनाने मुरली कामत याला सांगितले. त्याने हॉटेलचे व रेस्टॉरंटस बिल हे त्याच्या मेल आयडीवर मेल करण्यास सांगितले.
मुलासह मुरली कामतचे हॉटेलच्या खिडकीतून पलायन
17 जुलैला मुरली कामत याने काही औषधे मागवली होती ती औषधे घेऊन हॉटेल कर्मचारी मुरली यांनी बुक केलेल्या सुपर डीलक्स रूमकडे गेला. त्याने अर्धा तास मुरली यांच्या रुमची बेल वाजवली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने डुबलीकेट चावीने रूमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी मुरली त्यांच्या मुलासह रूममध्ये नसल्याचे निदर्शनास आले. ते रूममध्ये लॅपटॉप मोबाईल सोडून तसेच खिडकीतून पळाले होते त्यामुळे मुरली यांनी हॉटेल व्यवस्थापनाचे तब्बल पंचवीस लाख बुडवून मुलासह पलायन केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाने खारघर पोलीस ठाण्यात मुरली कामात विरुद्ध फसवणुकीची तक्राद दाखल केली आहे.