वसईच्या ’त्या’ संशयीत बोटीची अखेर पटली ओळख ; 26 तासानंतर खलाशाची सुटका

वसई (पालघर),

वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी अडकून पडलेल्या अज्ञात बोटीची अखेर 26 तासांनी ओळख पाठविण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. सदर बोट ही स्टील लाँच बोट आहे.

स्टील लाँच बोट दोरखंड तुटल्याने नायगवच्या उत्तन समुद्रातून भरकटून वसईच्या भुईगाव समुद्रातील खडकाळ भागात येऊन अडकली होती. ही अज्ञात बोट संशयित वाटत असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यासाठी आज सकाळपासून वसई पोलीस व कोस्टल गार्डच्या मदतीने बोटीचे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. मात्र ती खडकाळ भागात असल्याने कोस्टल गार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू ठेवले होते. या बोटीत एक खलाशी अडकला होता. त्याला हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करत किनार्‍यावर आणण्यात आले.

बोटीवर अडकलेल्या या खलाशाची तब्बल 26 तासांनी सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले. या बोटीचा गुरुवारीपासून काही पत्ता लागत नसल्याने पोलिसांची झोप उडाली होती. अखेर बोट व बोटमालकाची ओळख पटल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

गुरुवारी संध्याकाळ उशिरापर्यंत या बोटीचा किंवा त्यावर असलेल्या नागरिकांचा पत्ता लागला नव्हती. ही बोट खडकाळ भागात अडकल्याने बोट जागेवरून हलू शकत नाही. त्यामुळे हवाई दलाच्या विमानाच्या मदतीने संध्याकाळी उशिरापर्यंत प्रशासनाचे शोधकार्य सुरू ठेवल्याची माहिती वसई सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!