फणफणून ताप, प्लेटलेटस घटल्या आणि रक्तस्राव; चिमुकल्यांचा जीव घेतोय भयंकर आजार

लखनऊ,

एकिकडे कोरोनाव्हायरसच्या तिसर्‍या लाटेचा धोका लहान मुलांनाही आहे, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्याआधीच अशा एका भयंकर आजाराने थैमान घातलं आहे, जो सर्वाधिक चिमुकल्यांना आपलं बळी बनवतो आहे. त्यामुळे सरकारही हादरलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गेले काही दिवस तापाची प्रकरणं समोर येत आहे. तीव- ताप असलेले बरेच रुग्ण समोर येत आहे. फणफणून ताप आलेल्या रुग्णांचा काही दिवसांतच मृत्यू होतो आहे. फिरोजाबादमध्ये अशी बहुतेक प्रकरणं आढळली आहेत. या आजाराचं खरं रूप समोर आलं आहे

फिरोजाबादचे जिल्हाधिकारी चंद्र विजय सिंह यांनी सांगितलं, ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने मला हा डेंग्यू हेमरोजेनिक फिव्हर असल्याचं सांगितलं आहे. हा गंभीर आणि जीवघेणा असा आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या प्लेटलेटस झपाट्याने कमी होतात आणि त्यानंतर रक्तस्रावही होतो‘

आग-ा विभागाचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. ए.के. सिंह यांनी सांगितलं, डेंग्यू आणि इतर संशयित आजारामुळे 36 लहान मुलं आणि 5 प्रौढांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी आयसीएमआरच्या टीमने नमुने घेतले आहेत. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!