देशात इंदौरची ओळख ही इतिहास रचणार्‍या शहराच्या रुपात बनली

इंदौर,

मध्य प्रदेशमधील व्यापारीक शहर इंदौरची ओळख देशात इतिहास रचणार्‍या शहराच्या रुपात बनली असून देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून चार वेळा निवड, शंभर टक्के लोकसंख्येचे लशीकरणासह पहिल्या क्रमांक, वॉटर प्लस सिटी आणि आता येथील दोन भागांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) द्वारा क्लीन स्ट्रीट फूड हबचा टॅग प्रदान केला आहे.

स्वच्छतेच्या क्षेत्रात नवीन कीर्तिमान रचणारे इंदौरने खान्या पिण्यामध्येही उच्च गुणवत्ता उपलब्ध करण्याच्या दिशेमध्ये पाऊल टाकले आहे. याच कारणामुळे याला राज्यातील क्रमांक एकचा दर्जा प्राप्त झाला आहे. इंदौरच्या जगप्रसिध्द सोने बाजार आणि 56 दुकानांसह स्ट्रीट फूट सेंटरला भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकारण (एफएसएसएआय) द्वारा क्लीन स्ट्रीट फुड हबचा टॅग प्रदान करण्यात आला आहे.

एफएसएसएआयद्वारा प्रमाणित करण्यात आलेले इंदौर शहरातील 56 दुकाने आणि सराफा बाजाराच्या स्ट्रीटवर हाइजेनिक आणि स्वच्छ खाण्याचे पदार्थ मिळतात. अशाच प्रकारे क्लीन स्ट्रीट फूडचे दोन टॅग मिळविणारे इंदौर हे राज्यातील पहिले शहर बनले आहे.

उल्लेखनीय म्हणजे एफएसएसएआयद्वारा सराफा बाजार आणि 56 दुकानांच्या स्ट्रीट फूड सेंटरला थर्ड पार्टीकडून ऑडिटच्या माध्यमातून स्वच्छता, हाईजीन, शुध्दता, कचर्‍यांचे योग्य निपटारा आणि चांगल्या व्यवस्थेच्या वेगवेगळ्या मानदंडासह सर्वेक्षण करण्यात आले होते.

एफएसएसएआयने इंदौरमधील उक्त दोनीही स्ट्रीट फूड सेंटरला आपल्या मानदंडावर चाचणी केल्यानंतर क्लीन स्ट्र्ीट फूड सेंटर म्हणून प्रमाणित केले आहे. आता सामान्य जनता येथे विना कोणत्याही शंकांचे निश्चिंत होऊन स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकतात.

इंदौरमधील सामान्य जनतेमधील जागरुकतेचा परिणाम आहे की हे शहर प्रत्येक प्रकरणात दुसर्‍यांसाठी उदाहरण बनले आहे. याला चार वेळा देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. देशातील पहिले वॉटर प्लस सिटीचा गौरवही मिळाला आहे.

कोरोना विरुध्दच्या लढाईमध्येही या शहराने देशातील सर्व 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये इंदौर पहिला जिल्हा बनला आहे जेथे शंभर टक्के लोकांना पहिल्या डोजची लस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचे लशीकरणाचे लक्ष्य 28 लाख 7 हजार 559 होते परंतु याला ओलांडून 28 लाख 8 हजार 212 व्यक्तींचे लशीकरण करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!