लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने केली मुलीच्या काकांची हत्या

बुलडाणा,

बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. लग्नासाठी मुलगी देण्यास नकार देत असल्याचे मुलांकडील मंडळीने मुलीच्या काका आणि वडिलांवर हल्ला चढवला. यात मुलीच्या काकाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील जामोद गावात घडली आहे. या प्रकरणी मुलासह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

या घटनेनंतर जळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत गेल्या अनेक दिवसापासून शेजारी राहणारे मुलाला लग्नासाठी मुलगी देण्यास तयार नव्हते, त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून या मुद्द्याला घेऊन दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता. मात्र हा वाद विकोपाला गेला त्यात मुलीच्या काकाला प्राण गमवावे लागले. या मारामारीत जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिर्यादी सैय्यद अमीन सैय्यद अफसर यांनी दिलेली तक्रारीत सांगितले की, जखमी रसूल यांची मुलगी ही दहावीत शिकते. शेजारी राहणारा आरोपी शेख सद्दाम हा नेहमीच तिला त्रास देत होता. सद्दामला मुलीचे काका मृतक नूरखान यांनी त्याला समजावून सांगितले होते. तर सद्दाम याचे वडील त्याच्या मुलीच्या लग्ना करिता त्याच्या वडीलाकडे मागण्यासाठी गेले होते. परंतु त्यांनी मुलगी देत नाही असे सांगितले.

लग्नास नकार दिल्याने सद्दाम म्हणाला की, तुम्ही मुलगी देत नाही तर मुलीला पळवून नेल्यानंतर मुलगी देसाल काय ही घटना दहा-बारा दिवस पुर्वीची घडली होती. नंतर मुलीच्या काकांना चर्चेसाठी बोलवले होते. त्यांनी नकार दिल्याने व मागील वादाचे कारणावरून त्यांच्यात बोलचाल वरून वाद निर्माण झाला आणि मृतक नूरखान यास सद्दामने घरामध्ये मारहाण केली यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!