12 आमदार नियुक्ती : संजय राऊत यांचे राज्यपालांना थेट आव्हान

मुंबई,

12 राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून जी 12 नावे दिली आहेत. त्यांना राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी यादी मंजूर करण्याची विनंती केली होती.

राज्य सरकारने दिलेली विधान परिषद आमदारकीसाठीची 12 नावं मंजूर करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने काल संध्याकाळी राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी यादी लवकर मंजूर करण्याची विनंती केली.

सरकारने काल भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांना आव्हान दिले आहे. 12 आमदार तालिबानी किंवा गुंड नाहीत-, असे राऊत म्हणाले. राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर त्यांनी तसं जाहीर करावं, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी दिले. राज्यपालांनी आता कृती करून दाखवावी, असे ते यावेळी म्हणाले.

राज्यपाल नियुक्त आमदारांची पाठवलेली 12 नावे ही गुंड किंवा दहशतवाद्यांची नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर त्यांनी तो उघड करावा, असे आव्हान देताना 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत काय निर्णय होणार हे राज्यपालांनी आता कृतीतून दाखवा असं ते म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!