उत्तर प्रदेशमध्ये प्राथमिक शाळा परत एकदा सुरु
लखनऊ
उत्तर प्रदेशमध्ये प्राथमिक विद्यालय जवळपास सहा महिन्यांच्या काळानंतर बुधवार पासून कोविड प्रोटोकॉलचे पालन करत परत एकदा सुरु करण्यात आले असून गर्दीला टाळण्यासाठी शाळांनी दोन पाळ्यांमध्ये मुलांचे टॉफी, चॉकलेट व फुल देऊन स्वागत केले. मात्र शाळेत मुलांची उपस्थिती खूप कमी राहिली.
उत्तर प्रदेशमध्ये वर्ग 9 वी ते 12 वी वर्गाच्या शिक्षणासाठी शाळांना 16 ऑगस्ट पासून आणि वर्ग 6 वी ते वर्ग 8वी पर्यंतच्या शाळांना 23 ऑगस्ट पासून शिक्षणासाठी परत एकदा उघडण्यात आले आहे. मदरसांमध्येही बुधवार पासून कोविड-19 दिशा निर्देशांसह वर्गांना सुरु करण्यात आले आहे.
सर्व शाळांमध्ये शाळेच्या गेटवरच मुलांची थर्मल स्कॅनिंग करण्यात आली आणि त्यांना मास्क घालण्यास सांगण्यात आले. वर्गांमध्ये सॅनिटाइजरही ठेवण्यात आले आहे. या आधी मार्चमध्ये शाळांना काही दिवसांसाठी उघडले गेले होते परंतु कोविड-19च्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर परत एकदा या शाळांना बंद करण्यात आले होते.
प्राथमिक शाळांमध्ये मुलांचे शिक्षण कार्य हे दोन पाळीमध्ये होणार असून पहिली पाळी सकाळी 8 ते 11 वाजे पर्यंत चालेल आणि दुसरी पाळी सकाळी 11.30 पासून सुरु होईल. सरकारी शाळांमधील मुलांना आपले भांडे आणि पाण्याची बाटली स्वत: आणण्यास सांगण्यात आले आहे.
सरकारद्वारा शाळांना परत एकदा उघडण्याचा निर्णय घेतल्या गेल्या नंतरही विद्यार्थ्यांचे आई-वडिल मात्र अजूनही रुग्ण संंख्येतील वाढ आणि तिसर्या संभावीत कोविड-19 लाटेच्या भितीमुळे मुलांना शाळेत पाठविण्या बाबत आशंकित आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालकांची चिंता अजूनच वाढली आहे.
बुधवारी आपल्या पाच वर्षीय मुलीला शाळेत न पाठविणार्या साधिका तिवारीनी म्हटले की मुल शाळेत आणि वर्गात कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करतील याची आशा करणे मूर्खता आहे. ते एकत्र शिकतील आणि खेळतील आणि शिक्षक त्यांच्या समोरुन निघून गेल्यानंतर हे मुल मास्क हटवतील. मुलांना घरीच ठेवणे एकमेव उपाय आहे आणि ते ऑनलाईन शिकू श्कातात.