इस्कॉन तर्फे ऑनलाइन श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात । धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल ; भाविकांनी घेतला लाभ
जालना,
धर्माचा आधार्मावर, प्रकाशाचा अंधारावर आणि दहा प्रकारच्या असुरी प्रवृतींवर विजय म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी असून श्रीकृष्ण भगवंताची सेवा हीच खरी परम सेवा आहे. तीच आपल्या उध्दाराचे साधन बनेल. असे प्रतिपादन रास गोविंद प्रभू यांनी कृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात केले.
अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संग ( इस्कॉन) तर्फे संपूर्ण जगात साजरी होत असलेली श्री कृष्ण जन्माष्टमी जालना शहरात तीन दिवस फेसबुक, झूम,गुगल मेट, युट्युब च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने उत्साह व भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यात भागवत कथा, प्रवचन,ोक पठण, अभिषेक, महाआरती, भगवंताचे शृंगार, व्यंजनांचे भोग, या धार्मिक विधीं सोबतच लहान मुले- मुलींसाठी चित्रकला, वेशभूषा ,नाटिका, गायन स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती.
रविवारी ( ता. 29) पहाटे पाच ते नऊ पयर्ंत भागवत कथा, शृंगार दर्शन, सायंकाळी चार ते सहा या वेळी श्रीमद् भागवत गीतेतील ोकांचे पठण करण्यात आले, सोमवारी ( ता. 30) सकाळी मंगल आरती, श्री कृष्णांवर आधारित कथा, भगवंताचे ऑनलाईन दर्शन, सायंकाळी एकशे आठ व्यंजनांचे भोग असलेले नेवैद्य अर्पण करून भजन, किर्तन , राञी बारा वाजता श्री कृष्ण जन्मोत्सवाची महाआरती करण्यात आली.
रास गोविंद प्रभू यांनी प्रवचनात श्री कृष्ण भक्ती चे महत्त्व सांगून कृष्ण सेवेतच मानवाचा उध्दार असल्याचे निरूपण केले.
मंगळवारी ( ता. 31) प्रभुपाद यांची गुरूपूजा, सायंकाळी नंदोत्सव व प्रभुपाद अविर्भाव महोत्सवात भाविकांनी प्रभुपादांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात झालेल्या अमुलाग्र बदलांचे अनुभव कथन केले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. उत्सव यशस्वीतेसाठी गोविंद दत्त दास, इंजि.अनया अग्रवाल, मुकेश अग्रवाल, किशोर तिवारी, ज्योती गोरंट्याल, मंगल मुंदडा, सुनीता आंधळे यांनी परिश्रम घेतले.