पुंछमधील एलओसीवर दोन घुसखोरांसह पाक नागरीक ठार
जम्मू,
जम्मूमधील पुंछच्या नियंत्रण रेषेवरुन 30 ऑगस्टला होत असलेल्या घुसरोखीच्या प्रयत्ना अयशस्वी करताना दोन घुसखोरांना मारण्यात आलेे यापैकी एक पाकिस्तानी नागरीक होता अशी माहिती भारतीय सैन्यांने मंंगळवारी दिली.
पत्रकारांशी बोलताना बि-गेडियर पुनीत डोभाल यांनी म्हटले की 30 ऑगस्टला पहाटे भारतीय सैन्याच्या जवानानी एलओसीच्या पलीकडून दहशतवाद्यांच्या घुसरोखीच्या प्रयत्नाना अयशस्वी केले.
बि-गेडियर डोभाल यांनी म्हटले की एलओसीवर तैनात भारतीय सैन्यांच्या जवानाना गुप्तचर संस्थाद्वारा दिल्या गेलेली एका विशिष्ट माहिती मिळाली होती. यानंतर तत्काळ कारवाईसाठी दलाला सक्रिय करण्यात आले आणि दहशतवाद्यांना आव्हान दिले गेले. यानंतर दहशतवाद्यांनी मोठया प्रमाणात गोळ्या चालविल्या. याला भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी मारले गेले.
त्यांनी सांगितले की दहशतवाद्यांचे शव, एक एके 56 रायफल, पाच मॅगजीन, 133 राउंड एके सीरीज दारुगोळा, चार हातगो्ळे, 13,370 रुपये किंमतीचे पाकिस्तानी चलन आणि पाकिस्तानच्या महापंजीयकद्वारा प्रसिध्द एक आयकार्डला जप्त करण्यात आले आहे. याचे नाव मोहम्मद अकरम आहे जो पाकिस्तानचा रहिवाशी होता.
डोभाल यांनी म्हटले की गोळीबारीच्या तत्काळनंतर या भागाची विस्तृत तपासणीच्या दरम्यान नियंत्रण रेषेच्या पलिकडे एक सीरीज रायफल आणि दारुगोळासह एक अन्य दहशतवाद्यांच्या शवाला पाहिले गेले.