व्हायरल; युरोपियन स्पेस एजन्सीने शेअ केला मंगळावरील भूस्खलनाचा फोटो
नवी दिल्ली,
आपल्या अनेक लोकांमध्ये नेहमीच मंगळ, सूर्यापासून चौथा स्थानी असलेला ग-ह कुतूहल निर्माण करतो. लोकांना या शेजारच्या ग-हाबद्दल वेगवेगळ्या देशांनी केलेल्या वैज्ञानिक शोधांमुळे थोडे अधिक जाणून घेण्यास मदत झाली आहे. तसेच, विविध सोशल मीडियाद्वारे प्रत्येक वेळी जगभरातील अंतराळ संस्थांद्वारे लोकांना मंगळाचे मंत्रमुग्ध फोटो पाहण्याची संधी मिळते. ‘मार्टियन लँडस्लाइड’ चा अविश्वसनीय फोटो युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) द्वारे शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आहे.
हा फोटो 13 एप्रिल 2021 रोजी एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑॅर्बिटरने काढला असून त्या फोटोमध्ये मंगळाच्या एओलिस प्रदेशात (151.88 ॅ ए/27.38 ॅ ड) 35 किमी रुंद खड्ड्याच्या काठावर 5 किमी लांबीचा भूस्खलन दिसू शकतो, असे एजन्सीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. त्यांनी भूस्खलनाबद्दल पुढील काही ओळींमध्ये अधिक स्पष्ट केले.
भूस्खलन ही विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितींमध्ये घडणारी भौगोलिक प्रक्रिया आहे. पृथ्वीप्रमाणे मंगळावर, ते विविध साईज आणि आकारात येतात आणि पृथ्वीवरील अॅनालॉग्सचा वापर ग-हांच्या शरीरावर दिसणार्या समान प्रक्रिया समजण्यासाठी केला जातो. त्यांनी पोस्टच्या खाली पुढे लिहले आहे. ही पोस्ट दोन दिवसापूर्वी शेअर करण्यात आली आहे. पोस्ट केल्यापासून, फोटोला 22,000 पेक्षा जास्त लाइक्स आहेत आणि ही संख्या वाढतच आहे. या फोटोवर काही लोकांनी आवर्जून कमेंटसही केल्या आहेत.