शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थावर ईडीचा छापा; चौकशी सुरू…
वाशीम,
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती आहे. भाजपाने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आज ईडीने धाड टाकत भावना गवळी यांच्या संस्थाची चौकशी सुरू केली आहे.
या पाच ठिकाणी ईडीची चौकशी सुरू –
ः साई डोमेस्टिक प्रायव्हेट लिमिटेड
ः साई भूमी कन्स्ट्रक्शन
ः महिला उत्कर्ष प्रतिष्ठान
ः साईस्थान डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड
ः दानिश इन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड
किरीट सोमय्या यांचे आरोप –
खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ-ष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना केवळ 25 लाखात विकत घेतला आहे. खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी मी ईडी, सीबीआय, राज्यसरकार तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गवळी यांच्यावर दोन आठवड्यात कारवाई सुरू करणार असल्याचे 20 ऑॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी सांगितले होते.
किरीट सोमय्या यांच्यावहर दगडफेक –
पार्टीकल बोर्ड कारखान्यात भेट देण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या हे वाशिम येथे आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर शेतकरी व शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भावना गवळी यांच्यावर भ-ष्टाचाराचे आरोप केले होते.
भावना गवळी यांनी फेटाळले आरोप –
खासदार भावना गवळी यांनी किरीट सोमैया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी हे वाशिमचे भूमाफिया आहेत. यांनी 500 कोटींचा भ-ष्टाचार केला आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी मी अमित शाह यांना भेटणार असून ईडी, सीबीआयची चौकशी लावणार असून माझ्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे भावना गवळी यांनी म्हटलं.