महाविकास आघाडीतील एकूण अकरा नेत्यांवर अटक कारवाई होणार; किरीट सोमैया यांचे भाकीत

मुंबई,

आघाडी सरकारचे मंत्री अनिल परब यांना तुरुंगात जावं लागणार असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी दिला आहे. दापोली येथील अनधिकृत बंगला, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. यासंबंधीची तक्रार आपण केली असून, त्यानंतर ही कारवाई सुरू झाली असल्याचं किरीट सोमैया यांनी सांगितले.

तसेच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ-ष्टाचार झाला आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. आज वाशिममध्ये ईडीडून भावना गवळी यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. आघाडी सरकारच्या एकूण अकरा नेत्यांवर अटकेची कारवाई होईल, असे भाकीत किरीट सोमैया यांनी केले आहे.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने छापा टाकल्याची माहिती आहे. भाजपने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आज ईडीने छापा टाकत भावना गवळी यांच्या संस्थांची चौकशी सुरू केली आहे.

खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ-ष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना केवळ 25 लाखात विकत घेतला आहे. खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी मी ईडी, सीबीआय, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गवळी यांच्यावर दोन आठवड्यात कारवाई सुरू करणार असल्याचे 20 ऑॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोमैया यांनी सांगितले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!