शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, ईडीकडून चौकशी सुरु, किरीट सोमय्या म्हणाले…

वाशिम,

यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संबंधित काही संस्थांची ईडीच्या अधिकार्‍यांकडून चौकशी सुरू आहे. आज खासदार भावना गवळीच्या संबंधित काही संस्थांच्या चौकशीसाठी वाशिम येथे ईडीच्या टीम दाखल झाल्या आहेत. दरम्यान, भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

एकेकाळी भावना गवळींच्या वडिलांचा सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. त्यानंतर हे प्रकरण भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरले. एवढेच नाही तर सोमय्यांनी वाशीमला येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, भावना गवळी यांच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळयावर आज ईडीने कारवाई केली. मी समाधानी आहे. भावना गवळी यांनी 55 कोटी रुपयांचा कारखाना त्यांच्याच बेनामी कंपनीला अवघ्या 25 लाखाला दिला. मुख्यमंत्री कार्यालय यांच्या दबावाखाली फक्त एफआयआर केली. भावना गवळी यांच्या कार्यलयातून 60 कोटी रुपये चोरीला गेले. एवढे पैसे आले कुठून भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली आहे, असं सोमय्या म्हणाले. भावना गवळी यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे बाकी इतर संस्थांच्या कारवाई होणार आहे, असं ते म्हणाले.

 काय आहेत आरोप

1992 ला पणन संचालकांकडे श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना मर्यादित पुंडलिकनगर रजिस्टर झाला. ज्याचे अध्यक्ष होते भावना गवळींचे वडील पुंडलिकराव

राष्ट्रीय सहकार निगम ने कारखान्याला रुपये 43.35 कोटी निधी दिला. ज्याचे हमीपत्र राज्य शासनाचे होते

2001 पर्यंत कारखाना सुरु केला नाही, पण मशीन, बिल्डिंग सगळी उभी झाली

2001 ला स्वत:ची मुलगी खासदार भावना गवळी अध्यक्ष असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानाला शासनाची परवानगी न घेता आणि निविदा न काढता सहकारी कारखान्याची 14 हेक्टर जमीन विकत दिली

2001 ला खासदार भावना गवळी कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या

2007 मध्ये तत्कालीन पणन संचालक, पणन मंत्री आणि वित्त मंत्री ह्यांनी कारखाना अवसनात काढण्याची परवानगी दिली

परवानगी मजेशीर होती असा आरोप, ज्या अध्यक्षाने म्हणजे भावना गवळी यांनी कारखाना बुडवल्याचा आरोप आहे त्यांनाच ङखटणखऊअढजठ नेमले

अवसायक मंडळावर असणारे इतर सदस्य – भावना गवळींच्या आई शालिनीताई आणि त्यांच्याच संस्थेचा सदस्य मदन रामजी काळे आणि नातेवाईक श्यामराव जाधव

कारखाना विकायची परवानगी मागितली पण प्रस्ताव पाठवताना 2282008 ला वाशीमचे जिल्ला उपनिबंधक यांनी ज्या अटीशर्ती टाकल्या होत्या त्या पाळल्या नाहीत

तिसर्‍यांदा जाहिरात काढली, जुलै 2010 ला तालुका स्तराच्या वर्तमानपत्रात. टेंडर मंजूर केले

टेंडर मिळालेल्या कंपनीचे नाव – भावना ऍग-ो प्रॉडक्टस अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड – अशोक गांडोळे यांचे 90म शेयर्स जे भावना गवळींचे अधिकृत पीए आहेत

निविदा मंजूर केलेल्या कंपनीचे पैसे नाहीत

मग शासनाची परवानगी न घेता तत्कालीन पणन संचालक ह्यांनी बँक गॅरंटीवर कारखाना विकण्याची परवानगी दिली

परत टेंडर काढायला पाहिजे होते, ते ही केले नाही

16 ऑॅगस्ट 2010 ला निविदा न काढता पीए असणार्‍या गांडोळेला कारखाना विकला

बँक गॅरंटीची अट होती ज्यात द रिसोड अर्बन कोपराटीव्ह क्रेडिट सोसायटी यांची रुपये 6.84 कोटी बँक गॅरंटी घेतली

ज्या क्रेडिट सोसायटीने हि बँक गॅरंटी दिली त्या पत संस्थेच्या अध्यक्ष ही भावना गवळीच

बँक गॅरंटी देताना रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटीने काहीच मॉर्गेज घेतले नाही

हे पैसे शासनाकडे भरण्याची जवाबदारी थ्घ्ैंळघ्अऊध्ीं बोर्डाकडे होती, ते पैसे अजून ही भरलेले नाही . न ते पैशे पतसंस्थेने भरले

जो सहकारी कारखाना होता तो अश्या पद्धतीने पीएशी संगनमत करून गिळंकृत केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!