उत्तर प्रदेश : मंत्र्यांना खड्डे असलेल्या रस्त्यावरुन पायी चालण्यासाठी मजबूर केले

रामपूर (उत्तर प्रदेश),

उत्तर प्रदेशातील रामपूरमधील लोकांनी राज्याचे मंत्री बलदेव सिंह औलख यांच्या गाडीला अडविले व खड्डयांनी भरलेल्या रस्त्यावरुन पायी चालण्यासाठी त्यांना मजबूर केले.

उत्तर प्रदेशातील मंत्री बलदेव सिंह औलख हे शनिवारी संध्याकाळी आपला मतदारसंघ बिलासपूरमधील एका सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात असतानाच रामपूरमधील स्थानीय लोकांनी त्यांच्या कारला रोखले आणि त्यांना खड्डे पडलेल्या रस्त्यावरुन चालण्यास सांगितले. हा रस्ता पाऊस व नाल्याच्या पाण्याने भरलेला होता. या रस्त्याची दूरुस्ती करण्यात आली होती आणि या खड्डयांमध्ये माती टाकण्यात आली आणि यावर भाजलेला चुना टाकला गेला होता. परंतु पावसाने कामावर पाणी फिरविले.

मंत्र्यांची कार रोखार्‍या स्थानिय लोकांनी मागील अनेक महिन्यां पासून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक तक्रारी दिल्या पासून कोणताही परिणाम निघाला नसल्याच्या कारणामुळे हे आंदोलन करत होते.

स्थानिय निवासी राम इकबाल सिंहने म्हटले की अनेक तक्रारीनंतरही लोकांच्या समस्यांवरील समाधानासाठी काहीही करण्यात आले नाही. रस्त्याची स्थिती सतत खराब होत राहिली आणि पाऊस याला अजूनच खराब करत आहे. आम्ही यावरुन चालूहू शकत नाहीत. शेकडो लोक या रस्त्याचा उपयोग करुन कार दुर्घटनाच्या जोखमेचा सामना करत आहेत.

यानंतर मंत्री जे स्थानिय आमदारही आहेत त्यांनी स्थानिय प्रशासन आणि नगरपालिकेच्या गैर जबाबदाराच्या दृष्टिकोणावर टिका केली. त्यांनी म्हटले की लोक ज्या अडचणींचा सामना करत आहे या मुद्दांना लवकरात लवकर सोडविले गेले पाहिजे.

त्यांनी स्थानिय प्रशासनावर क्षेत्रात विकास कार्यांच्या प्रति गैर जबाबदार असल्याचा आरोप केला. औलखनी लोकांना आश्वासन दिले की ते या प्रकरणाला राज्यस्तरावर उपस्थित करतील.

मागील महिन्यात हापुड जिल्ह्यातील एका गावाच्या पदयात्रेवर असलेले गडमुक्तेश्वरचे भाजपचे आमदार कमल मलिकांनाही त्यांच्या मतदारसंघातील जलमय असलेल्या रस्त्यावरुन चालण्यास सांगण्यात आले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!