फसविणर्‍या सुकेश विरुध्द नोंदविलेल्या गुन्ह्यात ईडीने जॅकलीन फर्नांडीजचे निवेदन नोदविले

नवी दिल्ली,

फसवणुक करणारा सुकेश चंद्रशेखर यांच्या विरोधात हिंदी चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीजने सोमवारी केंद्रिय प्रवर्तन निदेशालय (ईडी) च्या समोर आपले निवेदन नोंदविले.

जॅकलीन फर्नाडीजने सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात नोंदविलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आपले निवेदन नोंदविले असून ती पाच तासापेक्षा अधिक काळ प्रवर्तन निदेशालयाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात उपस्थित होती. परंतु तिची चौकशी केल्याला ईडीने नाकारले आहे.

मूळ बेंगळूरचा रहिवाशी असलेला 27 वर्षीय चंद्रशेखरवर 15 प्राथमिकी नोंदविलेल्या आहेत. एक शानदार जीवनशैलीसाठी त्याने बेंगळूरु आणि चेंन्नईतील लोकांना कोटयावधी रुपयांना फसविले आहे. तो सध्या दिल्लीतील तिहार जेलमध्ये बंद आहे.

ईडीने 23 ऑगस्टला त्यांचा आलीशान बंगला, नगदी 82.5 लाख रुपये आणि एक डझनपेक्षा अधिक लक्झरी कारांना जप्त केले होते. त्याच्यावर तिहार जेलमधून 200 कोटी रुपयांचे खंडणीचे रॅकेट चालविण्याचा आरोप आहे तसेच त्याच्यावर राजकिय नेत्यांच्या जवळचा असल्याचा आरोप आहे. त्याच्यावर आरोप आहे की त्यांने लोकांना त्यांचे काम करुन देण्याचे आश्वासन देऊन 100 पेक्षा अधिक लोकांना फसविले आहे. तो जबरदस्तीने वसूलच्या पैश्यातून रॉल्स रॉयससह महागडया कार खरेदी करत होता.

चंद्रशेखर तामिळनाडूमध्ये सामान्यपणे बीटलच्या कारमध्ये प्रवास करत होता आणि दाव करत होता की तो तत्कालीन मुख्यमंत्री एम.करुणानिधीचा पूत्र आहे. त्याने आंध- प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस.आर. रेड्डीचा पुतण्या आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पाचा सचिव बनवून अनेक लोकांना फसविले आहे.

केरळमधील कोच्चीशी संबंधीत एका प्रकरणात सुकेशने इमॅनुएल सिल्वसना एका प्रचार कार्यक्रमासाठी बॉलीवुड अभिनेत्री कॅटरीना कैफला आणण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांच्याकडून त्याने 20 लाख रुपये घेतले होते. तो कोट्टायममध्ये शोरुमच्या उद्घाटनासाठी तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जूनला घेऊन आला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!