आता ’या’ ठिकाणी पोलिसांना केळी खायला मिळणार नाहीत… नक्की हे केळी प्रकरण आहे तरी काय?

इंदूर,

पश्चिम विभागाचे एसपी महेश चंद जैन यांना रोल-कॉलमध्ये जवानांना केळी वाटप करण्याचा स्वत: दिलेला आदेश स्वत:च रद्द करावा लागला आहे. परंतु असे का झाले? खरेतर सैनिकांना केळी देण्याबाबत बरीच चर्चा झाली. सोशल मीडियापासून ते पोलिस खात्यापर्यंत या आदेशाबाबत विविध चर्चा झाल्या. केळी वाटपाच्या आदेशामागे एसपीचा सकारात्मक विचार होता. परंतु काही आधिकार्‍यांच्या नकारात्मक विचारामुळे त्या आदेशाला रद्द करण्यात आले. ज्यामुळे या जवानांना आता केळी मिळणार नाहीत.

इंदूर पश्चिम विभागाच्या एसपीचा असा विश्वास होता की, कायदा आणि सुव्यवस्था वगैरे बाबतीत सैनिकांना अनेक तास ड्युटी करावी लागते. कर्तव्यामुळे जवान अनेक वेळा अन्न खाण्यासही असमर्थ असतात. म्हणजेच त्यांना जेवण जेवायला देखील वेळ मिळत नाही. केळी हे सर्वात पौष्टिक अन्नांपैकी एक आहे. म्हणून या लोकांना केळी पुरवली जावी असे आदेश देण्यात आले होते.

परंतु त्याचवेळी, अनेक माजी पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांनी याआधी कधीही कशातही असे आदेश असल्याचे पाहिले नाहीत आणि वाचले देखील नाहीत. तसेच या जवानांना केळीचे वाटप केल्यामुळे विभागाच्या बजेटमध्ये देखील फरक पडतो. ज्यामुळे हा केळी वाटण्याच्या गोष्टीला उचलून धरले गेले.

परंतु यावर नंतर एसपी चे असे म्हणणे होते की, जर स्टेशन प्रभारीने या गोष्टींचे बिल सरकारला दाखवले, तर सरकार याची भरपाई आपल्याला देऊ शकते.

सुरूवातीला केळी वाटपाच्या ऑॅर्डरमुळे अनेक स्टेशन प्रभारींनी रोल-कॉल दरम्यान केळी वितरीत केल्या, परंतु नंतर या ऑॅर्डरवर सर्वत्र चर्चा सुरू झाल्याने आणि लोकांचे नकारात्मक विचार समोर येऊ लागल्याने, केळी वाटण्याच्या या आदेशाला रद्द केले गेले आहे. यासंदर्भात एक पत्र देखील जारी करण्यात आले आहे.

हे प्रकरण पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचले

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोल-कॉलच्य वेळी केळी वाटप करण्याच्या लेखी आदेशाची बाब पोलीस मुख्यालयात पोहोचली होती. त्यावेळेस तिथल्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांचे मत या आदेशाबाबत नकारात्मक होते. ज्यामुळे जवानांना केळी वाटण्याचा हा आदेश काही दिवसातच थांबवण्यात आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!