आरसिबी ला मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर

मुंबई,

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसर्‍या टपप्याला येत्या 17 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मजबतू धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार ऑॅलराऊंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे या दुसर्‍या टप्प्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे बंगळुरुसाठी हा मोठा धक्का आहे. आरसीबीच्या अधिकृत टिवटर हॅन्डलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

सुंदरला बोटाला झालेल्या दुखापतीमुळे या दुसर्‍या टप्प्याला मुकावं लागलं आहे. वॉशिंग्टनला इंग्लंड दौर्‍यावर असताना ही दुखापत झाली होती. यानंतर त्याला मायदेशी परतावं लागलं होतं. सुदंरने आयपीएल्या 14 व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने 6 सामन्यांमध्ये अवघ्या 31 धावाच केल्या होत्या. तसेच 3 विकेटसही पटकावल्या होत्या. दरम्यान इतक्या दिवसांनंतरही वॉशिंग्टन दुखापतीनंतर सावरलेला नाही.

वॉशिंग्टनच्या जागी कोणाला संधी?

दरम्यान वॉशिंग्टनच्या जागी संघात आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. आकाश दीप हा वेगवान गोलंदाज असून तो बंगालसाठी खेळतो. आकाश सध्या आरसीबीसाठी नेट बॉलर आहे.

आरसीबी पॉइंटसटेबलमध्ये कितव्या स्थानी?

आरसीबी पॉइंटसटेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. बंगळुरुने या मोसमात 7 सामने खेळले आहेत. या 7 सामन्यांपैकी विराटच्या टीमने 5 सामन्यात विजय मिळवले आहेत. तर 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबी 10 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर विराजमान आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!