टोकियो पॅराऑॅलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल यांचे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई,

टोकियो येथील पॅराऑॅलिम्पिक स्पर्धेत महिला टेबल टेनिसचे रौप्यपदक जिंकणार्‍या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेले ऑॅलिंपिक पदक देशातील युवकांना, दिव्यांग बंधूजनांना क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी घडविण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भाविनाबेन पटेल यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत, खडतर परिश्रमांतून देशाला ऑॅलिंपिक रौप्यपदक जिंकून दिलं आहे. जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ऑॅलिंपिक रौप्यपदक जिंकण्याचा चमत्कार घडवला आहे. त्यांचं यश हे देशाचा गौरव वाढवणारं आणि देशवासीयांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भाविनाबेन पटेल यांचं कौतुक केलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!