पॅरालिम्पिक तिरंदाजी : भारत थायलँडला पराभूत करुन मिक्सड टिम कंपाउंडच्या उपात्यपूर्व सामन्यात

नवी दिल्ली,

भारताच्या ज्योति बालियान आणि राकेश कुमारच्या जोडीने थायलँडच्या प्राफापोर्न होमजांथुएक आणि एनोन एउंगाफिनानच्या जोेडीला 147-141 ने पराभूत करुन मिश्रीत टिम कंपाउंड इव्हेंटच्या उपात्यपूर्व सामन्यात प्रवेश केला.

भारतीय जोडीने पहिल्या फेरीत थाई जोडीच्या बरोबरीचा 35चा स्कोर केला. यानंतर पुढील फेरीत भारतीय जोडीने 36 अंक मिळविले परंतु थायलँडच्या जोडीने 37 अंक घेऊन स्कोर 72-71 केला आणि आघाडी घेतली,

ज्योती आणि राकेशने नंतर पुढील चार एरोव्समधून 38 अंक मिळविले परंतु थायलँडची जोडी 36 अंक मिळू शकली आणि भारताने 109-108 ने आघाडी घेतली.

थायलँडच्या प्राफापोर्न आणि एनोनच्या जोडीने अंतिम चार एरोव्समधून 33 अंक मिळविले तर भारतीय जोडीने 38चा शॉर्ट खेळून उपात्य सामन्यात प्रवेश केला.

या दरम्यान ज्योतिचा महिला व्यक्तीगत कंपाउंड ओपन तीरंदाजी इव्हेंटमधील प्रवास हा आयरलँडच्या केरिए लोउसी लिओनार्डकडून 116 एलिमिनेशन राउंडमध्ये पराभूत झाल्याने समाप्त झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!