बारा तब्लीगी जमात सदस्य सर्व आरोपांमधून मुक्त
बरेली (उत्तरप्रदेश),
उत्तर प्रदेशातील बरेलीचे मुख्य न्यायिक दंडाधिकारीनी तब्लीगी जमातीच्या 12 सदस्यांना आता सर्व आरोंपामधून मुक्त केले आहे. या सर्वांना 15 महिन्यांपूर्वी कोविड मानदंडाचा निष्काळजीपणा आणि अवज्ञा करण्याच्या आरोपामध्ये जेलमध्ये पाठविले गेले होते.
न्यायालयाने ज्या 12 तब्लीगी सदस्यांना निर्दोष मुक्त केले आहे यामध्ये थायलँडचे नऊ नागरीक, त्यांचे दोन अनुवादक आणि शाहजहाँपूरमधील मशिदीचे एक कार्यवाहक आहेत. हे सर्वजण दिल्लीतील जमात मण्डलीमध्ये भाग घेतल्यानंतर तेथेच राहत होते. थाई नागरीकांना त्यांच्या देशात माघारी पाठविण्याची परवानगी दिली गेली आहे.
जमात सदस्यांचे वकिल मिलन गुप्तानी म्हटले की शनिवारी तोंडी आदेश मंजूर करण्यात आला आहे. मुक्त झाल्याच्या निर्णयाची प्रत तत्काळ दिली जात नाही. आम्ही यासाठी अर्ज केला आहे आणि हे मंगळवारी न्यायालय सुरु झाल्यानंतर उपलब्ध व्हायला पाहिजे.
मागील वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला तब्लीगी जमातीच्या निजामुद्दीन मरकज (केंद्र) मध्ये हजारो लोक जमा झाले होते. मरकजने म्हटले की या आयोजनात 2300 विदेशी नागरीकांनी भाग घेतला होता. जमातची बैठक 15मार्च 2020 पर्यंत समाप्त झाली होती. यानंतर केंद्र सरकारने टाळेबंदीची घोषणा केली. त्यावेळी विदेशी नागरीक देश सोडून जाऊ शकले नाहीत आणि ते तेथेच राहिले.
यातील नऊ थाई नागरीक होते आणि ते शाहजहाँपूरला गेले आणि आपले दोन अनुवादक हुसैन अहमद आणि अब्दुल सरदार एम.एस (दोघेही तामिळनाडूचे होते) त्यांनाही बरोबर नेले होते.
या सर्वांना मशिदीचे कार्यवाहक मासिउल्लाह बरोबर 1 एप्रिलला अटक करण्यात आली होती. थाई नागरीकांवर विदेशी अधिनियम (व्हीजा नियमांचे उल्लंघन) चे कलम 14 च्या अंतर्गत गुन्हा नोंदविला होता.
ते जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचे प्रकरण इलाहाबाद उच्च न्यायालयात गेले असता त्यांनी नोव्हेंबरमध्ये त्यांना जमानत दिली. परंतु आरोपाना हटविले नव्हते. नऊ थाई नागरीकांचे पासपोर्ट पोलिसांकडे होते आणि ते देशाला सोडू शकत नव्हते आणि त्यांना मशिदीत ठेवले गेले होते.