मित्रांच्या एकाधिकारशाहीवर देश बोलतोय; मन की बातवरून राहुल गांधींचा निशाणा
नवी दिल्ली,
कॉग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातवरून पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. टिवटरवर एक टिवट करून राहुल यांनी केंद्राला लक्ष्य केले आहे. ‘देश कर रहा है मित्र-मनॉपली की बात!‘ असे टिवट राहुल गांधी यांनी केले आहे.
मन की बातचा धागा पकडून निशाणा
राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सातत्याने निशाणा साधत आहेत. रविवारी मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाचा धागा पकडत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘देश कर रहा है मित्र-मनॉपली की बात!‘ असे टिवट राहुल गांधी यांनी केले आहे. केंद्र सरकारची नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन योजना ही मोदींच्या मित्रांच्या एकाधिकारशाहीसाठी असल्याची टीका राहुल गांधी यांनी केलेली आहे. त्यावरूनच मोदी मन की बात करत असताना देश मित्रांच्या एकाधिकारशाहीची बात करत असल्याचे राहुल यांना या टिवटमधून सुचवायचे आहे असे मत राजकीय विेषक व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावरून सातत्याने टीका
राहुल गांधी सोशल मीडियावरून सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. नॅशनल मॉनेटायझेनश पाईपलाईनची घोषणा केल्यानंतर राहुल अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. या मुद्द्यावरूनच ते सातत्याने केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. ञ्च्खपवळरजपडरश्रश हा हॅशटॅग वापरत राहुल गांधी या योजनेच्या मुद्द्यावरून केंद्रावर टीका करत आहेत.