अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा चर्चेत; कारण काय?

अमरावती,

खासदार नवनीत राणा या सार्वजनिक जीवनात सातत्याने चर्चेत राहतात. कधी त्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांसोबत होळीला आदिवासी नृत्य करताना दिसतात तर कधी क्रिकेटच्या मैदानातही दिसतात. यावेळी आता आणखी एका नवीन काम करताना खासदार नवनीत राणा दिसून आल्या.

सध्या गणेशोत्सव जवळ येत आहे. त्यामुळे गणपती उत्सवासाठी कुंभार समाजातील बांधव गणपतीच्या मूर्ती बनवण्यात व्यस्त आहे. अशातच खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील एका मुर्तीकाराच्या घरी जाऊन गणपतीची मूर्ती मूर्तीकार तयार करत असतांना मूर्तीवर हात फिरवला. तसेच मूर्तीकाराशी संवाद साधत कशाप्रकारे मूर्ती तयार करण्यात येते? किती वेळ लागतो ही माहिती मूर्तीकाराकडून घेतली. सदर मूर्ती ही मूर्तीकाराने पूर्णपणे तयार केली होती. दरम्यान नवनीत राणा यांनी या मूर्तीवर हात फिरवत मूर्तिकारांशी संवाद देखील साधला. यासंबंधीचा व्हिडिओही त्यांनी टिवट केला आहे.

याधीही झाल्या होत्या ट्रोल?

अलीकडच्या काही दिवसांपूर्वी नवणीत राणा यांचा चुलीवर भाकरी थापतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी नेटकर्‍यांनी चक्क नवनीत राणा यांच्या चुलीवरील स्वयंपाकाचा सबंध थेट वाढत्या सिलेंडरच्या महागाईशी जोडून त्यांची खिल्ली उडवली होती.

खासदार राणा यांचे आवाहन –

नागरिकांनी पर्यावरण पूरक गणपती बसवण्याचा आवाहन यावेळी खासदार नवनीत राणा यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!