संवेदनशील, साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई,
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, नाटककार जयंत पवार यांच्या निधनामुळे आपण संवेदनशील, साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले श्री. पवार यांनी मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले होते. श्री. जयंत पवार यांनी नेहमीच रंगभूमीवर काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न केला. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीघार्ंक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा.ाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीघार्ंक) होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती सवार्ंच्या स्मरणात राहतील.
श्री. पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना श्री. देशमुख यांनी आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.