काबूल विमानतळावरील आत्मघातकी हल्ल्याचा भारताकडून निषेध, दहशतवादाविरोधात जगाने एकत्र येण्याची व्यक्त केली गरज

नवी दिल्ली,

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापिते केल्यानंतर काबूल विमानतळावर देश सोडणार्‍यांची प्रंचड गर्दी होत आहे. अशा परिस्थितीतच गुरुवारी मध्यरात्री काबूलच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये जवळपास 72 नागरिकांचा बळी गेला. या घटनेचा भारताकडून तीव- शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारचा दहशतवाद आणि त्यांच्या कारवायांना मदत करणार्‍या विरोधात जगाने एकत्र उभे राहिले पाहिजे, असे मतही भारताकडून व्यक्त करण्यात आले आहे.

या दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोटात कमीतकमी 60 अफगाणी आणि 12 अमेरिकन सैनिक मारले गेल्याची माहिती अफगाण आणि अमेरिकन अधिकार्‍यांनी दिली आहे. तर हा हल्ला खडखड-घ या दहशतवादी संघटनेनी केल्याचे मान्य केले आहे.

काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही या दहशतवादी हल्ल्याचा तीव- निषेध करतो. या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबाप्रती आम्ही संवदेना व्यक्त करतो. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. अशा प्रकारचे हल्ल्यामुळे हे निश्चित आहे की, दहशतवाद आणि त्याला मदत करणार्‍याविरोधात जगाने आता एक होणे गरजेचे आहे.

अफगाणीस्तानमधून 31 ऑॅगस्टपर्यंत अमेरिका आपले सैन्य माघारी घेणार आहे. त्यामुळे अनेक देश आपले नागरिक अफगाणिस्तानातून बाहेर काढत असतानाच हा आत्मघातकी हल्ला झाला. गेल्या आठवडाभरापासून तालिबान्यांच्या भीतीने गांगरून गेलेले हजारो अफगाणी देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी करत आहेत.

पाश्चिमात्य राष्ट्रांनी तेथे संभाव्य हल्ल्याचा दिला होता इशारा-

काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ स्फोट झाल्यामुळे अज्ञात लोकांचे बळी गेले आहेत, ङ्गअसे टिवट अमेरिकेच्या सार्वजनिक व्यवहार विभागाचे संरक्षण सचिव जॉन किर्बी यांनी केले आहे. पेंटागॉनचे म्हणणे आहे की, काबूल विमानतळाच्या बाहेर स्फोट झाला. प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, स्फोटात झालेल्या जीवितहानीबाबत तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही. हजारो अफगाणी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात अनेक दिवसांपासून विमानतळावर जमले आहेत.

अफगाणिस्तानच्या तालिबानांच्या ताब्यातून हजारो लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांनी तेथे संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता. तसेच तालिबानी हे आत्मघाती बॉम्बस्फोट करतील यामुळे अनेक देशांनी काल नागरिकांना विमानतळावर जाण्याचे टाळवे असे आवाहन केले होते.

’दहशतवाद्यांना सोडणार नाही, शोधून काढू आणि शिक्षा देऊ’; जो बायडेन यांचा आयएसआयएसला इशारा

वॉशिंग्टन डी. सी – काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. एका अफगाण अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, या आत्मघातकी हल्ल्यात जवळपास 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 143 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये काही अमेरिकन लष्करी अधिकार्‍यांसह काही लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी खडखड या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या घटनेचा अमेरिकेने निषेध व्यक्त केला आहे. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दशतवाद्यांना दिला आहे.

काबूल विमानतळावर हल्ल्यामागे खडखड-घ चा हात आहे. हा हल्ला घडवणार्‍या खडखड-घ ला आणि अमेरिकेला नुकसान पोहचवण्याची इच्छा बाळगणार्‍यांना आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि शिक्षा देऊ असे बायडेन म्हणाले.

अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच राहिल. अफगाणिस्तान असलेल्या अमेरिकन नागरिकांची आम्ही सुटका करू. आमचे मिशन सुरूच राहणार आहे. गरज पडल्यास आणखी सैन्य अफगाणिस्तानात पाठवण्यात येईल, असे बायडेन म्हणाले.

ज्याची भीती होती तेच घडलं..

अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. काबुल विमानतळावर होणारी गर्दी पाहता दहशतवादी हल्ल्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. जेल तोडल्यानंतर बाहेर पडलेले अफगाणिस्तानच्या आयएसआयएसचे दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.

कधी झाला बॉम्बस्फोट –

काबुल विमानतळावर गुरुवारी सायंकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. पहिला बॉम्बस्फोट विमानतळाच्या आत धावपट्टीजवळ झाला. आत्मघातकी हल्लेखोर लोकांच्या गर्दीत शिरला, तर दुसरा स्फोट हॉटेल बॅरनबाहेर झाला. हॉटेल बॅरन हे विमानतळाजवळ असून बि-टनचे सैनिक तेथे मुक्कामाला आहेत. बॉम्बस्फोट झाल्यानंतर विमानतळाबाहेर प्रचंड गोंधळ झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!