अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मुंबईत नामांकित कॉलेज कट ऑॅफ नव्वदी पार

मुंबई,

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. मुंबईत नामांकित कॉलेज कट ऑॅफ नव्वदी पार गेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत कॉलेज कट ऑॅफ मध्ये फारसा फरक नाही. 40 हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 2 न भरल्याने पहिल्या गुणवत्ता यादीत मागील वर्षीच्या तुलनेत कॉलेजच्या कट ऑॅफ मध्ये फारसा फरक नाही. दुसर्‍या गुणवत्ता यादीत या विद्यार्थ्यांना सामील करून घेतल्यास कट ऑॅफ मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई विभागात 1,17,883 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज प्राप्त झाले आहे. मुंबई विभागात एकूण अर्ज भरल्यापैकी 61.69 टक्के विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत. मुंबई विभागात 48,788 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. मुंबईत सायन्स 40,354, कॉमर्स 65028, आर्टस् 11768 शाखेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज मिळाले आहेत.

मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे कट ऑॅफ –

एच आर कॉलेज –

कॉमर्स -93.4 टक्के

के सी कॉलेज

आर्टस् – 88.2 टक्के

कॉमर्स -91.4 टक्के

सायन्स – 90 टक्के

जय हिंद कॉलेज

आर्टस् – 91.6 टक्के

कॉमर्स – 92 टक्के

सायन्स – 89 टक्के

रुईया कॉलेज

आर्टस् – 93 टक्के

सायन्स – 93.4 टक्के

रुपारेल कॉलेज

आर्टस् – 88 टक्के

कॉमर्स -90.4 टक्के

सायन्स – 91.6टक्के

मिठीबाई कॉलेज

आर्टस् – 89.6 टक्के

कॉमर्स -91.6टक्के

सायन्स – 90 टक्के

वझे केळकर कॉलेज

आर्टस् – 89 टक्के

कॉमर्स -91.8 टक्के

सायन्स – 93.6 टक्के

झेवीयर्स कॉलेज

आर्टस् – 95.2 टक्के

सायन्स – 92.8 टक्के

एन एम कॉलेज –

कॉमर्स -94 टक्के

पोदार कॉलेज –

कॉमर्स – 92.8 टक्के

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!