मुसलमानाना सामुहिकपणे भाजपमध्ये सामिल करणे अजूनही अवघड – लियाकत अली
पणजी
मुसलमानाना सामूहिकपणे भाजपमध्ये सामिल होणे अजूनही अवघड असून भाजपमध्ये मुसलमान 25 टक्के हिस्सेदार आहेत कारण पक्षाची स्थापना करणार्या चार भाजप नेत्यांपैकी एक सिकंदर बख्त हे स्वत: मुसलमान होते असे मत भारतीय जनता पक्ष (भाजप) चे राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष लियाकत अलीनी मंगळवारी व्यक्त केले.
भाजपचे मुसलीम नेते व दिवंगत सिकंदर बख्त यांच्या जयंती निमित्त येथे आयोजीत भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या एका बैठकीत बोलताना लियाकत अलीनी म्हटले की दोन कुटुंबाना एकत्र आणावे आणि तुम्ही चार ते आठ कुटुंबाना जोडू शकाल. सर्व मुसलमानाना भाजपमध्ये एकाच वेळी आणणे मुश्किल आहे ते सहजपणे सामिल होणार नाहीत.
अलीनी मुस्लिम समुदायातील सदस्यांना सकारात्मक विचार करण्याचा आग-ह करत म्हटले की मुसलमानानी एकत्र आले पाहिजे, एकजुट झाले पाहिजे आणि सरकारच्या विकास प्रयत्नांमध्ये सहभागी झाले पाहिजे. ज्यावेळी त्यांना माहिती होईल की मुसलमान त्याच्या बरोबर आहेत तर ते तुमचे काम करण्याच्या आधी दोन वेळा विचार करणार नाहीत.
अली 2022 च्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाच्या आउटरीच कार्यक्रमा अंतर्गत गोव्याच्या दौर्या आहेत. त्यांनी म्हटले की मुसलमानाची संख्या राज्याच्या 15 लाख लोकांमध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख आहे आणि हा एक फायदा आहे कारण अपेक्षाकृत कमी संख्येच्या कारणामुळे अल्पसंख्याक समुदायातील सदस्यांना एकजुट करणे सोपे असेल.
ते म्हणाले की गोवा 15 लाख लोकसंख्येचे एक लहान राज्य असून यामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख मुसलमान असतील. ऐवढया लोकांना एकजुट करणे सोपे आहे. अन्य राज्यात 50 लाख ते दोन कोटी मुसलमान आहेत त्यांना एकजुट करणे मुश्किल आहे. हे एक लहान राज्य असून हे भारतासाठी एक उदाहरण होऊ शकते आहे.
त्यांनी म्हटले की की आम्ही अनेक वर्षानंतर या कार्यक्रमाचे (दिवंगत सिकंदर बख्त यांची जयंती) आयोजन करत आहोत. कारण आम्ही भाजपामध्ये 25 टक्के हिस्सेदार आहोत. 1980 मध्ये ज्यावेळी भाजपची स्थापना झाली होती त्यावेळी चार संस्थांपैकी एक आमच्यापैकी एक होते. सिकंदर बख्त यांना पद्म विभूषणने सन्मानीत करण्यात आले होते.