ओडिशा : पुरीतील जगन्नाथ मंदिर भक्तांसाठी उघडले

भुवनेश्वर,

ओडिशाच्या पुरीमधील प्रसिध्द श्री जगन्नाथ मंदिराला चार महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर सोमवार पासून परत एकदा भक्तांसाठी उघडले गेले आहे.

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन (एसजेटीए) चे मुख्य प्रशासक कृष्ण कुमार यांनी सांगितले की भक्त सोमवार पासून शुक्रवार पर्यंत आठवडयातील दिवसांमध्ये सकाळी 7 वाजल्या पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दर्शन करु शकतील. मंदिर सर्व शनिवार व रविवारी सार्वजनिक दर्शनासाठी मात्र बंद राहतील.

त्यांनी सांगितले की, मागील एक आठवडयाच्या दरम्यान पुरी नगर पालिका क्षेत्रातील जवळपास 50 हजार भक्तांनी मंदिरामध्ये दर्शन केले आहे. आता भक्त कोणत्याही स्थानावरुन मंदिरात प्रवेश करु शकतात.

कुमार म्हणाले की मला आशा आहे की सर्व भक्तगण कोविड-19 ला पाहता प्रसिध्द करण्यात आलेल्या मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) चे पालन करतील.

पुरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक (एसपी) कंवर विशाल सिंहनी सांगितले की भक्तांना सहजपणे देवाचे दर्शन करण्यासाठी तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी भक्तांकडून प्रतिक्रिया (फीडबॅक) घेण्यासाठी एक विशेष केंद्र बनविले आहे. भक्त एक फॉर्म जमा करुन किंवा ऑनलाईन क्यूआर कोड स्कॅनिंग सिस्टिमच्या माध्यामातून किंवा मॅन्युअलच्या माध्यमातून मंदिरामध्ये पोलिस सेवेवरील आपली प्रतिक्रिया सादर करु शकतात.

ओडिशातील गंजम जिल्ह्यातील एक भक्त रबी नारायण रथ यांनी सांगितले की मी दिर्घकाळा नंतर भगवान जगन्नाथाचे दर्शन करुन खूप आनंदी आहे. सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी अधिकार्‍यांचे धन्यवाद.

पश्चिम बंगालमधील एका भक्तांने सांगितले की खूप चांगली व्यवस्था केली गेली आहे. मंदिरामध्ये येणार्‍या भक्तांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये आणि कोविड-19 संक्रमणाचा कोणताही धोका असणार नाही.

कोविड-19 रुग्णांमधील वाढीनंतर सामान्य जनतेच्या प्रवेशासाठी 24 एप्रिल 2021 पासून मंदिराला बंद करण्यात आले होते. सेवादार परिवार आणि पुरीतील नागरीकांना परवानगी दिल्यानंतर सोमवारी मंदिराला सर्व भक्तांसाठी परत एकदा उघडण्यात आले.

शनिवार आणि रविवारच्या व्यतिरीक्त प्रमुख सणांच्या दिवशी मंदिर बंद राहिल. कारण अशा प्रकारच्या उत्सवासाठी होणार्‍या विशाल सभांच्या कारण कोविड-19 पसरण्याच्या कोणत्याही पध्दतीला रोखले जाऊ शकेल.

भक्तांसाठी एका रांगेची प्रणाली उभी करण्यात आली आहे जी मंदिर परिसरातील उत्तर-पूर्वमधील चपल स्ठँडच्या समोरुन बॅरिकेडसच्या माध्यमातून प्रवेश करतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!