कल्याण सिंह यांच्या पार्थिववरील तिरंग्यावर भाजपाचा झेंडा; विरोधकांचा आक्षेप
नवी दिल्ली,
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांचे पार्थिव झाकण्यात आलेल्या राष्ट्रध्वजावर भाजपाचा झेंडा टाकण्यात आला होता. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भारतीय युवा काँग-ेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी रविवारी एक फोटो टिवट केला आहे. ज्यामध्ये कल्याण सिंह यांचा मृतदेह हा राष्ट्रध्वजाने झाकलेला दिसतो. पण त्यातील अर्धा भाग भाजपा पक्षाच्या ध्वजाने झाकलेला दिसत आहे. न्यू इंडियात राष्ट्रीय ध्वजावर पक्षाचा झेंडा लावणे ठीक आहे का, असा सवाल श्रीनिवास बी. व्ही यांनी भाजपाला केला आहे. त्याच्या टिवटनंतर सोशल मीडियावर युजर्स भाजपाविरोधात रोष व्यक्त करत आहेत.
’भारत राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही’, असे टिवट युवक काँग-ेसने आपल्या अधिकृत हँडलवरून केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीही फोटो टिवट करत भाजपावर टीका केली. ’देशापेक्षा पक्ष मोठा. तिरंग्याच्यावर झेंडा. याचा भाजपाला नेहमीप्रमाणे: ना खेद, ना पश्चाताप, ना दु: ख, ना शोक, असे त्यांनी म्हटलं.
कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लखनऊ गाठून त्यांना श्रद्धांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि बसपा (बहुजन समाज पार्टी) प्रमुख मायावती यांनीही कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. सिंह यांच्यावर अंतिम संस्कार 23 ऑॅगस्ट रोजी गंगेच्या काठावरील नरोरा येथे केले जातील. कल्याण सिंह राम मंदिर चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली. तेव्हा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतर सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.