जालना लॉयन्स क्लब ला उत्कृष्ट सेवेसाठी चार पुरस्कार

जालना,

सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या जालना लॉयन्स क्लब ला सन 2020- 21 या वर्षातील सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल सर्वोच्च पुरस्कारासह आरोग्य सेवेसाठी प्रथम , पर्यावरण पूरक साठी द्वितीय व अन्य एक अशा चार  पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे.

नुकतेच औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात लॉयन्स चे बहु प्रांतीय प्रांतपाल लॉ. विवेक अभ्यंकर ,प्रांतपाल लॉ. दिलीप मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रथम उपप्रांतपाल लॉ.पुरुषोत्तम जयपुरिया, प्रांतीय प्रकल्प समन्वयक लॉ. अतुल लढ्ढा यांची उपस्थिती होती.

सन 2020 – 21 या वर्षात  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तत्कालीन अध्यक्ष लॉ. राजेश देवीदान ,सचिव लॉ. दिनेश लोहिया, कोषाध्यक्ष लॉ. राधेशाम टिबडेवाल, झोन चेअर पर्सन लॉ. अरुण मित्तल यांनी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने  मास्क ,सॅनिटायझर वाटप ,टाळेबंदी मुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबियांना किराणा व भोजनाची पाकिटे वाटप केली.स्काऊट गाईड कार्यालय परिसरात  वृक्षारोपण ,नेत्रसेवा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अनाथ आश्रमात मुलांना भोजन , गौ शाळांत चारा वितरण करण्यात आले.

इयत्ता दहावीच्या पन्नास विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करून साडेतीनशे विद्यार्थिनींना ऑनलाईन शिक्षणासाठी डाटा उपलब्ध करून देण्यात आला.

महत्त्वाचे म्हणजे जालना लॉयन्स क्लब तर्फे मागील चार वषार्ंपासून सुरू असलेल्या ऑर्थोपेडिक बँकेचा गतवर्षी दोनशे साठ रूग्णांना लाभ झाला. याची विशेष नोंद घेत प्रांतातर्फे या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले.

पर्यावरण पूरक प्रकल्पासाठी दितीय अन्य उत्कृष्ट सेवेसाठी द्वितीय, तसेच अवॉर्ड ऑफ एक्सलन्स अशे चार पुरस्कार मिळाले असून या बद्दल नूतन कार्यकारिणी, सदस्य व जालना लॉयन्स परिवाराने अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!