’मोर्चा नको तर काय भजन करू का?’ शेट्टींचा मुश्रीफांना टोला; स्वाभिमानी शेतकरी संघटेनाचा कोल्हापूरमध्ये आक्रोश मोर्चा

कोल्हापूर,

ज्या लोकांचे नुकत्याच झालेल्या महापुरामुळे जे नुकसान झाले आहे. त्या लोकांना (2019)च्या धर्तीवर पूरग-स्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी आणि विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. दरम्यान, पुर ओसरून महिना उलटला तरीही सानुग-ह(तातडीने मिळणारी मदत) अनुदानही शेतकर्‍यांना मिळालेले नाही. शासनाने शेतकर्‍यांची थट्टा लावली आहेका? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य शासनावर निशाणा साधला आहे.

राजू शेट्टी यांनी मोर्चा काढू नये असे ग-ाम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आवाहन केले होते. याबाबत विचारले असता, मोर्चा नको तर काय भजन करू का? असा उलट सवाल राजू शेट्टी यांनी ग-ामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केला आहे. शिवाय यांनी केलेल्या टीकेलाही सभेमध्ये उत्तर दिले जाईल असही शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!